पाहा व्हीडिओ : लोक या कुत्र्याच्या पिलाला एवढ्या आवडीने का खात आहेत?
हे कुत्र्याचं पिलू लोकांना फार आवडतंय. पण खेळायला नाही तर खायला. काय चाललंय काय?
हो खरंच. लोक या पिलाला खाण्यासाठी दररोज 5 ते 10 डॉलर मोजतायत. पण का?
हे खरंतर एक आईसक्रीम आहे. कुत्र्याच्या पिलासारखं दिसणारं हे आईसक्रीम कापायला लोकांना वाईटही वाटतं, पण लोक आवडीने खातातही.
तुम्ही खाणार का, असं तुमच्या आवडत्या पेटच्या रूपातलं आईसक्रीम?
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)