पाहा व्हीडिओ : हात-पाय गमवावे लागले तरीही ती हरली नाही

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : हात-पाय गमवावे लागले तरीही ती हरली नाही

अमँडा फ्लोरेस या तरुणीनं तिच्या जिद्दीच्या बळावर एक अनोखी गोष्ट केली आहे. आजारपणामुळे हात-पाय गमवावे लागल्यानंतरही कृत्रिम हात-पायांच्या साथीनं लग्नाच्या दिवशी नृत्य केलं.

अमँडाला सर्दी झाल्यानंतरच्या एका संसर्गाचा इतका फटका बसला की ती 2 महिने कोमात गेली होती. त्यानंतर तिचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांना तिचे हात-पाय कापावे लागले.

पण, या काळात तिचा प्रियकर फ्रँकनं तिला चांगली साथ दिली. तो तिच्याशी लग्नालाही तयार झाला.

अमँडान निर्धार केला, लग्नाला कृत्रिम हात आणि पायांच्या साथीनं जायचं आणि नृत्यही करायचं.

हे वचन तिनं अखेर पूर्ण केलं.

पाहा तिच्या जिद्दीचा प्रवास!

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)