पाहा व्हीडिओ - दुसऱ्या महायुद्धातल्या या रणभूमीवर आता होणार फुटबॉल वर्ल्ड कप
रशियातल्या वोल्गोग्राड शहरात फुटबॉल वर्ल्ड कपसाठी एक स्टेडियम बांधलं जात आहे. त्याच्या खोदकामात दुसऱ्या महायुद्धात ठार झालेल्या सैनिकांचे अवशेष सापडत आहेत.
या शहरात स्टॅलिनग्राडची ऐतिहासिक लढाई झाली होती. दुसऱ्या महायुद्धात या लढाईत 20 लाख सैनिकांना प्राण गमवावा लागला होता. दरवर्षी व्होल्गोगार्ड शहराच्या परिसरात साधारण 1000 सैनिकांचे अवशेष सापडत आहेत, असं त्या ठिकाणी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी बीबीसी रशियनला सांगितलं.
बेवारसपणे रणभूमीवर पडलेल्या मृत सैनिकांच्या अवशेषांना आता दफन करण्याचं काम चालू आहे. रशियात फिफा वर्ल्डकप 2018ची जय्यत तयारी चालू आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)