You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
"लोकांनी मला भीक मागायचा सल्ला दिला, पण..."
सोलापूर जिल्ह्यातल्या हत्तूर बस्ती नावाच्या छोट्याश्या गावात 1987मध्ये फेब्रुवारी महिन्यात बंदेनवाझ यांचा जन्म झाला. जन्मजात व्यंग असलेले 31 वर्षांचे बंदेनवाझ नदाफ आज एक प्रथितयश चित्रकार आहेत.
आपल्या कलेच्या माध्यमातून दरमहा 25 ते 30 हजार रुपये कमावणाऱ्या बंदेनवाझ यांच्या चित्रांची प्रदर्शनं जहांगीर आर्ट गॅलरीतही झाली आहेत. आता ते Indian Mouth and Foot Painter's Association (IMFPA) चे कलाकार म्हणून काम करतात.
बंदेनवाझ त्यांच्या उदाहरणातून इतरांना सांगतात, "लोकांनी मला मंदिराबाहेर किंवा मशिदीबाहेर बसून भीक मागण्याचा सल्ला दिला होता. पण मला तसं आयुष्य जगायचं नव्हतं. चित्रकलेची गोडी लागली, IMFPA सारख्या संस्थेचं पाठबळ मिळालं आणि मी उभा राहिलो."
शूट - रोहन टिल्लू, राहुल रणसुभे
एडिट - रोहन टिल्लू
हे पाहिलंत का?
- पाहा व्हीडिओ : जेरुसलेमचा वाद नेमका आहे तरी काय?
- 'मी १४ वर्षांचा असताना त्या धर्मगुरूने माझ्यावर बलात्कार केला'
- सविताच्या मृत्यूनंतर झाली आयर्लंडमध्ये क्रांती; सार्वमतात मिळाली गर्भपाताला परवानगी
- पाहा व्हीडिओ : ...तर सुटीच्या दिवशी जास्त झोपा आणि आयुष्य वाढवा!
- IPLच्या चीअरलीडर्संचं आयुष्य कसं असतं? IPLच्या चीअरलीडर्संचं आयुष्य कसं असतं?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)