पाहा व्हीडिओ : चीनच्या रस्त्यांवर लाखो सायकलींचा खच

चीनमधल्या शांघायसह इतर शहरांमध्ये रस्त्यांवर लाखो सायकलींचा खच पडल्याचं चित्र सध्या दिसतं आहे.

प्रवासासाठी नागरिक सायकल शेअर करत असल्यानं ही स्थिती निर्माण झाली आहे.

वाहतुकीत या सायकल अडथळा ठरत असल्यानं इथल्या पोलिसांनी सायकल जप्त करण्यास सुरुवात केली आहे.

सायकल शेअर करण्याच्या बाजारात अनेक कंपन्या उतरल्या आहेत.

या कंपन्यांनी सायकल जप्त करण्यास विरोध केला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)