पाहा व्हीडिओ : मुंबईच्या रस्त्यावर आले होते 101 हत्ती

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : मुंबईच्या रस्त्यावर आले होते हत्ती

हत्तींबद्दलच्या जनजागृतीसाठी मुंबईतील वरळी सी फेसवर एलिफंट परेड आयोजित करण्यात आली होती. या प्रदर्शनात विविध कलाकारांनी साकारलेल्या 101 हत्तींच्या शिल्पाकृती मांडण्यात आल्या होत्या.

हत्तींच्या संवर्धनासाठी जगभरातील 24 देशांमध्ये हा उपक्रम साकारण्यात आला. भारतामध्ये कोलकाता, जयपूर, नवी दिल्ली, मुंबईत या परेडचे आयोजन करण्यात आले होते. 'एलिफंट फॅमिली' आणि 'गुड अर्थ' यांच्या सहयोगाने हे प्रदर्शन भरवण्यात आलं होतं.

बीबीसी मराठीसाठी राहुल रणसुभे यांचा रिपोर्ट.

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)