पाहा व्हीडिओ - पाडवा शोभायात्रेत नऊवारीतल्या सायकलस्वार : पर्यावरणप्रेमींचा उपक्रम
नऊवारी साडी नेसून बाईक रायडिंग करणाऱ्या तरुणी हे दृश्य गिरगावच्या शोभायत्रेत हमखास पाहायला मिळतं. पण यंदा पहिल्यांदाच बायक रायडर महिलांच्यासोबतीला महिला सायकलिस्टही या शोभायात्रेत सहभागी झाल्या होत्या.
फिरोजा सुरेश आणि तिच्या सहकाऱ्यांनी प्रदूषणमुक्त शहर आणि फिटनेसचा मंत्रही दिला. "आम्हा सर्वांचे जाती- धर्म वेगवेगळे आहेत. पण भारतात आपण सर्व एक आहोत," असंही फिरोजा म्हणतात.
गिरगावच्या रस्त्यांवरून नऊवारी साडी नेसून निघालेल्या महिल्या सायकलिस्ट सर्वांचं लक्ष वेधून घेत होत्या.
(व्हीडिओ स्टोरी - जान्हवी मुळे, प्रशांत ननावरे)
तुम्ही हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)