पाहा व्हीडिओ: या मांजराला इतका राग का येतो?

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ: या मांजरामुळं तिचे मालक झाले आहेत मालामाल.

या मांजरीला जगातलं सर्वांत रागीट मांजर म्हणजे Grumpy cat म्हटलं जातं. का? तर तिचा चेहरा चिडका दिसतो. त्यामुळे तिला हे नाव पडलं.

तिच्यामुळे तिचे मालक मात्र मालामाल झाले आहेत. तिचे फोटो विविध उत्पादनांवर झळकतात. त्यातून तिच्या मालकांना पैसे मिळतात.

ग्रेनेड बेव्हरेज या कंपनीनं तिचा फोटो एका उत्पादनावर वापरण्याचे हक्क घेतले होते. पण त्यांनी तिचे फोटो दुसऱ्या उत्पादनावर वापरण्यास सुरुवात केली. म्हणून तिच्या मालकांनी न्यायालयात धाव घेतली. निकाल मालकांचा बाजूने लागला आणि त्यांना भरपाई देण्याचा न्यायालयाने आदेश दिला. तिच्या मालकांना अंदाजे 44 कोटी रुपये इतकी भरपाई मिळाली.

हे पाहिलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)