पानिपतच्या युद्धानंतरही सदाशिवराव भाऊ जिवंत होते?
पानिपतच्या युद्धात सदाशिवराव भाऊ पेशवे मारले गेले, असा इतिहास आहे. पण हरयाणातल्या रोहतक जिल्ह्यातल्या सांघी गावातले लोक मात्र काही वेगळंच सांगतात.
या लोकांच्या मते पानिपतच्या युद्धात जखमी झाल्यावर सदाशिवराव भाऊ युद्धभूमीवरून बाहेर पडले. दक्षिणेकडे सरकत ते सांघी गावात आले.
इथल्या लोकांनी त्यांना आसरा दिला. त्यांनी कुरुक्षेत्राजवळ जाऊन नाथ पंथाची दीक्षा घेतली. त्यानंतर पुन्हा सांघीला येऊन त्यांनी आपला मठ स्थापन केला.
पानिपतच्या युद्धानंतर तीन वर्षांनी म्हणजे 1764मध्ये त्यांनी समाधी घेतली, असं गावकरी सांगतात.
तुम्ही हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)