You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाहा व्हीडिओ: हा जगप्रसिद्ध विनोदवीर ओळखू येतोय का?
डोक्यावर टोपी, हातात काठी, आखूड पँट आणि छोटीशी मिशी. असा अवतार नसेल तर चार्ली चॅप्लिन तुम्हाला ओळखू येतील का?
आपल्या विविध चित्रपटांमधून अनेक विषयांवर भाष्य करणाऱ्या चार्ली चॅप्लिनचा विनोद आजही कालबाह्य ठरत नाही.
स्वतः एकही शब्द न बोलता, फक्त हावभावांच्या मदतीने प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा चॅप्लिनचा आवाज कसा होता?
अमेरिकेतील आर्थिक मंदी असो, दुसरं महायुद्ध असो किंवा हिटलरच्या नाझी जर्मनीतली परिस्थिती असो, अनेक गंभीर आणि प्रसंगी बिकट प्रसंगांचं चित्रण चॅप्लिन यांनी आपल्या खास शैलीत करून चित्रपटसृष्टीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं.
नर्मविनोदी शैलीत आशयगर्भ चित्रपट काढणाऱ्या या कलाकाराचं चित्रपटांमधून दिल्या जाणाऱ्या संदेशांबद्दल काय मत होतं?
1957 साली 'अ किंग इन न्यू यॉर्क' या चित्रपटाच्या प्रीमियरपूर्वी लंडनमध्ये बीबीसीशी चार्ली चॅप्लिन आपल्या चित्रपटांबद्दल बोलले.
हे पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)