जेरुसलेमबद्दल इस्राईल आणि पॅलेस्टाईनमध्ये नेमका वाद काय?
इस्राईल आणि पॅलेस्टाईन यांच्यात जेरुसलेमवरून पराकोटीचा वाद आहे. 1947नंतर जेरुसलेमवर आंतरराष्ट्रीय नियंत्रण आलं. पण 1948च्या अरब-इस्राईल युद्धानं या शहराचे दोन तुकडे झाले.
इस्राईलने पश्चिम जेरुसलेम तर जॉर्डननं शहराच्या पूर्व भागावर ताबा मिळवला. नंतर 1967 मध्ये इस्राईलने एका युद्धात संपूर्ण शहरावर ताबा मिळवला. तेव्हापासून दोन लाख इस्रायली ज्यू पूर्व जेरुसलेममध्ये राहायला गेले. पॅलेस्टिनी पूर्व जेरुसलेमला राजधानी मानतात.
नुकतीच राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी जेरुसलेमला इस्राईलची राजधानी म्हणून मान्यता दिली आहे. यामुळे पॅलेस्टाईनचा याला विरोध आहे.
भौगोलिक वादाशिवाय या शहराला एक वेगळंच धार्मिक महत्त्व आहे. ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम धर्मांचा संगम या शहरात होतो.
तुम्ही ही क्विझ सोडवली आहे का?
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)