पाहा व्हीडिओ : २६/११ खटल्यात केवळ आरोप, कुठलेही पुरावे नाहीत - पाकिस्तान

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : २६/११ हल्ल्यातील पुराव्यांवरून भारत-पाकिस्तानचे आरोप प्रत्यारोप

26/11च्या मुंबई हल्ल्यातल्या आरोपींविरोधातल्या पुराव्यांवरून भारत आणि पाकिस्तानमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

या दोन्ही वकिलांना या खटल्यासंदर्भात दोन्ही देशांतील वकिलांशी बीबीसीनं बातचीत केली.

भारताने या हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानवर आरोप केले आहेत आणि त्यासंदर्भात पुरावेही सादर केले आहे.

आरोपींचे पाकिस्तानातील वकील रिझवान अब्बासी यांचं म्हणणं आहे की, या पुराव्यांना काही अर्थ नाही, ते फक्त डोजिअर्स आहेत.

भारताचे सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी भारताने सर्व पुरावे पाकिस्तानला दिले असल्याचं सांगितलं आहे. तसंच साक्षीदारांना पाकिस्तानात पाठवलं जाणार नसल्याचं निकम यांनी सांगितलं.

या व्हीडिओत दोन्ही वकिलांनी आपापल्या देशाची बाजू मांडली आहे.

मयुरेश कोण्णूर, जान्हवी मुळे (मुंबई) आणि शुमाइला जाफरी (इस्लामाबाद) यांचा रिपोर्ट.

एडिट - शरद बढे

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)