BBC Innovators : ‘एज्युकेट गर्ल्स’चं गावकऱ्यांना आवाहन - लग्नाचं नको, शिक्षणाचं बघा
भारतात 10 ते 14 वयोगटातल्या एक तृतीयांश मुली शाळेत जात नाहीत. त्यापैकी अनेक मुलींचं लग्न कोवळ्या वयातच लावून दिलं जातं. सफीना हुसेन यांची ‘एज्युकेट गर्ल्स’ ही संस्था हे रोखण्यासाठी कम करत आहे.
या संस्थेचे 10,000 कार्यकर्ते आहेत. जे घरोघरी जाऊन कुटुंबीयांना मुलींच्या शिक्षणाचं महत्त्व समजावून सांगतात. आजवर ‘एज्युकेट गर्ल्स’ संस्थेनं 20 लाख मुला-मुलींची मदत केली आहे.
- डेव्हिड रीड यांचा भारतातील बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसच्या इनोव्हेटर्स मालिकेसाठीचा रिपोर्ट.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)