रुपल पटेल यांची ही कंपनी आवाज नसणाऱ्यांना देते आवाजाची ओळख
आवाजाची देणगी सगळ्यांनाच लाभत नाही. आवाज नसलेल्यांना आवाजाचं दान देण्याचं आवाहन व्होकॅलिड कंपनीतर्फे केलं जातं. त्यातून निर्माण केला जातो युनिक व्हॉईस आणि ती आवाज नसणाऱ्यांची नवी ओळख बनते.
रुपल पटेल यांनी 2014 साली व्होकॅलिड ही कंपनी स्थापन केली. या अंतर्गत आवाज नसणाऱ्या लोकांना आवाज मिळवून देण्यासाठी त्यांनी ग्लोबल व्हॉइस बँकेची स्थापना केली. याद्वारे त्या युनिक व्हॉइस तयार करण्याचं काम करतात.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)