महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांची अंतिम यात्रा सुरु
महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यावर आज (सोमवार, 19 सप्टेंबर) अंत्यसंस्कार होत आहेत.
8 सप्टेंबर रोजी महाराणी एलिझाबेथ यांचं निधन झालं होतं. त्यानंतर आज अंत्यविधीचे सोपस्कार पूर्ण केले जात आहेत.
2 हजार देशांतर्गत पाहुणे, 500 परदेशी पाहुणे, 4 हजार अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणारा हा कार्यक्रम अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरणार आहे.
दुःखद प्रसंग आणि औपचारिकता असली तरी 21 व्या शतकातील अनेक महत्त्वपूर्ण घटनांपैकी एक अशी ही घटना मानली जाईल.

फोटो स्रोत, Getty Images
