मारिओपोलमधल्या मॅटर्निटी हॉस्पिटलवर हवाई हल्ला, हवाई क्षेत्र बंद करण्याची झेलेन्स्कींची पुन्हा मागणी
युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत 20 लाख लोकांनी युक्रेनमधून पलायन केलं असल्याची माहिती युनायटेड नेशन्सने बीबीसीला दिली आहे.
लाईव्ह कव्हरेज
अमृता दुर्वे
चेर्नोबिल शहराचे तुम्ही आजवर न पाहिलेले 10 फोटो
रशिया - युक्रेन युद्ध : चौदाव्या दिवशी काय काय घडलं?
नमस्कार,
रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा आजचा चौदावा दिवस आहे. युक्रेनमध्ये रशियाने हल्ला केलेल्या 6 शहरांत 12 तासांची युद्धबंदी जाहीर करण्यात आलीय. या काळात नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाता यावं, यासाठी हे 12 तास देण्यात आले आहेत.
आजच्या दिवसातल्या या काही महत्त्वाच्या घडामोडी
- युक्रेनच्या आग्नेयेकडील मारिओपोल शहरातल्या लहान मुलांच्या हॉस्पिटलवर रशियाने हवाई हल्ला केल्याचं सिटी काऊन्सिलने म्हटलंय. 'रशियन सैन्याने लहान मुलांच्या हॉस्पिटलवर बॉम्ब टाकले असून भयानक नुकसान झालं असल्याचं,' फेसबुकवर पोस्ट करण्यात आलेल्या निवेदनात म्हटलंय.
- "माणसं, मुलं ढिगाऱ्याखाली आहेत. हे भयंकर आहे! दहशतवादाकडे दुर्लक्ष करण्याच्या गुन्हात किती काळ जग साथीदार होणार आहे?" असा सवाल युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केलाय.
- अमेरिकेतील टीव्ही चॅनेल एबीसीला दिलेल्या मुलाखतीत झेलेन्स्की यांनी अनेक मुद्यांवर विस्तृतपणे भूमिका मांडली. 'आपण रशियाशी चर्चा करण्यासाठी तयार आहे. नेटो आम्हाला संघटनेत सामील करण्यासाठी तयार नसल्याचं स्पष्ट झालं. शरणागती पत्करून एखाद्या गोष्टीसाठी आर्जव करणारा मी राष्ट्राध्यक्ष होऊ इच्छित नाही,' असं झेलेन्स्की यांनी सांगितलं.
- युद्धाचा सर्वाधिक परिणाम झालेल्या 6 भागांमधून सामान्य नागरिकांना बाहेर पडता यावं म्हणून रशिया 12 तासांच्या युद्धबंदीसाठी तयार झाल्याचं युक्रेनच्या उप-पंतप्रधानांनी म्हटलंय.
- युक्रेनच्या स्थानिक वेळेनुसार सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत युद्धविरामासाठी रशिया तयार झाल्याचं इरिना वेरेश्चुक यांनी म्हटलंय.
- सुमी शहरातील ह्यूमन कॉरिडॉर मंगळवारप्रमाणे आजही खुला असणार आहे. काल या कॉरिडॉरच्या माध्यमातून 5000 लोकांनी शहर सोडलं होतं. यामध्ये 694 भारतीय विद्यार्थी होते.
- रशियाच्या आक्रमणानंतर युक्रेनच्या 2 दशलक्ष नागरिकांनी स्थलांतर केलं आहे, यामध्ये 800,000 लहान मुलांचा समावेश आहे असं 'सेव्ह द चिल्ड्रन' संस्थेनं म्हटलं आहे.
- युक्रेनमधील अभिनेता आणि टीव्ही निवेदक पाशा ली याचा रशियाने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला. रशियाच्या फौजांनी इरपिन शहरावर जोरदार हल्ले केले होते. 33 वर्षीय ली यांनी युक्रेनच्या लष्करात सहभागी करण्याचा निर्णय घेतला होता.
- रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लॅव्हरोव्ह आणि युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दाम्युट्रो कुलेबा हे एकमेकांची टर्कीत भेट घेणार आहेत. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून दोन्ही देशांचे परराष्ट्रमंत्री पहिल्यांदाच भेटत आहेत.
- रशिया - युक्रेन युद्धाचा परिणाम सोन्याच्या किंमतींवर होतोय. सोन्याच्या किंमती झपाट्याने वाढतायत. बुधवारी सोन्याचे दर 10 ग्रॅमसाठी 54 हजारांच्या वर गेले.
ब्रेकिंग, मारिओपोलमधल्या मॅटर्निटी हॉस्पिटलवर हवाई हल्ला, हवाई क्षेत्र बंद करण्याचं युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचं पुन्हा आवाहन
युक्रेनच्या आग्नेयेकडील मारिओपोल शहरातल्या लहान मुलांच्या हॉस्पिटलवर रशियाने हवाई हल्ला केल्याचं सिटी काऊन्सिलने म्हटलंय.
'रशियन सैन्याने लहान मुलांच्या हॉस्पिटलवर बॉम्ब टाकले असून भयानक नुकसान झालं असल्याचं,' फेसबुकवर पोस्ट करण्यात आलेल्या निवेदनात म्हटलंय.
या हल्ल्यात किती जणाचा जीव गेलाय हे अजून सांगता येणं शक्य नसल्याचं मारिओपोलच्या काऊन्सिलने म्हटलंय.
"मॅटर्निटी वॉर्ड, लहान मुलांचा वॉर्ड आणि हॉस्पिटलमधला थेरपी वॉर्ड या सगळ्याचं मारिओपोलवर रशियाने केलेल्या हवाई हल्ल्यात नुकसान झालं," सैन्याचे विभागीय प्रमुख पाव्लो कारीलेंको यांनी फेसबुकवर व्हिडिओ पोस्ट करत म्हटलंय.
या हल्ल्यात जखमी झालेल्यांना जवळच्या हॉस्पिटलला नेण्यात येतंय.
X पोस्टवरून पुढे जा, 1परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी देखील या घटनास्थळाचं फुटेज ट्वीट केलंय. हा थेट हल्ला होता असं त्यांनी म्हटलंय. या व्हिडिओत इमारतीच्या उद्ध्वस्त खोल्या आणि कॉरिडोर दिसतो.
"माणसं, मुलं ढिगाऱ्याखाली आहेत. हे भयंकर आहे! दहशतवादाकडे दुर्लक्ष करण्याच्या गुन्हात किती काळ जग साथीदार होणार आहे?" असा सवाल झेलेन्स्कींनी केलाय.
रशियाची विमानं युक्रेनवरून जाऊ नयेत म्हणून युक्रेनवरून नो फ्लाय झोन जाहीर करावा अशी मागणी झेलेन्स्कींनी पुन्हा एकदा केलाय. अमेरिका आणि नाटोतल्या इतर देशांनी ही मागणी मान्य केलेली नाही.
"हवाई क्षेत्र ताबडतोब बंद करा! मृत्यूसत्र थांबवा! तुमच्याकडे शक्ती आहे पण तुमच्याकडची मानवता तुम्ही गमावलेली दिसतेय," झेलेन्स्की म्हणाले.
X पोस्टवरून पुढे जा, 2परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
तामिनाडूतून युक्रेनमध्ये शिकायला गेला, आता सैनिक होऊन रशियाविरोधात लढतोय
युक्रेन युद्ध आणि महाग तेलाचा परिणाम सोन्या-चांदीच्या किंमतींवर, सोनं 54 हजारांवर

फोटो स्रोत, Getty Images
रशिया - युक्रेन युद्धाचा परिणाम सोन्याच्या किंमतींवर होतोय. सोन्याच्या किंमती झपाट्याने वाढतायत.
बुधवारी सोन्याचे दर 10 ग्रॅमसाठी 54 हजारांच्या वर गेले.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती वाढल्या असून याचा परिणाम देशांतर्गत किंमतीवरही होत असल्याचं HDFC सिक्युरिटीजने म्हटलंय.
चांदीच्या दरांमध्येही वाढ झालेली आहे. बुधवारी चांदीचे दर वाढून 72 हजारांच्या वर गेले.
PTI वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार HDFC सिक्युरिटीजचे सीनियर अॅनलिस्ट तपन पटेल म्हणाले, "सध्या सुरक्षित गुंतवणुकीसाठी लोकांचा कल सोन्याकडे वाढल्याने सोन्याच्या किंमती रेकॉर्ड पातळीवर पोहोचताना दिसत आहेत. महागाई वाढण्याची शक्यता लक्षात घेताही लोकांची सोन्यातली गुंतवणूक वाढतेय."
ते म्हणाले, "कमकुवत झालेला डॉलर आणि अमेरिकन बाँडच्या उत्पन्नात झालेली घसरण यामुळे सोन्याच्या घसरणाऱ्या किंमतींना ब्रेक लागलाय."
मोतीलाल ओस्वाल फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये कमॉडिटी रिसर्चे व्हाईस प्रेसिडंट नवनीत दमाणी म्हणाले, "तेलाच्या वाढलेल्या किंमती आणि युक्रेन युद्धामुळे महागाई वाढण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. यामुळेच सोन्यातली गुंतवणूक वाढतेय. धोका असलेल्या गुंतवणुकीकडे गुंतवणुकदारांचा कल कमी झालाय."
युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांचा आजवरचा प्रवास फक्त 10 फोटोंमध्ये
युद्धग्रस्त कीव्हच्या रस्त्यांवर रंगला म्युझिक कॉन्सर्ट
युद्धात होरपळलेल्या युक्रेनच्या कीव्ह शहरात काही मिनिटांसाठी हा होईना पण काही वेगळे आवाज घुमले.
कीव्ह ऑर्केस्ट्राच्या सदस्यांनी शहरातल्या इंडिपेंडन्स स्क्वेअरमध्ये एक उत्स्फूर्त सादरीकरण केलं.
गोठवणाऱ्या थंडीमध्ये, हॅट्स आणि कोट्स घालत त्यांनी विविध संगीत रचना सादर केल्या. यामध्ये युरोपियन युनियनचं गान - ओड टू जॉय (Ode to Joy) ही संगीतकार बिथोविनची रचनाही होती.
हातात युक्रेनचे झेंडे घेऊन हा कॉन्स्टर्ट ऐकण्यासाठी जमा झालेली लहानशी गर्दी सोशल मीडियावरच्या व्हीडिओंमध्ये दिसते.
युक्रेनियन सरकारने देशावरून 'नो फ्लाय झोन' जाहीर करण्याचं केलेलं आवाहन सर्वांपर्यंत पोहोचावं आणि युद्ध संपावं असा या उत्स्फूर्त कॉन्सर्टचा हेतू होता, असं या ऑर्केस्ट्राचे कंडक्टर हर्मन माकारेंको यांनी सांगितलं.
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
युक्रेनमध्ये रशियन फौजा किती पुढे सरकल्या आहेत?


युक्रेनमधल्या कोणत्या शहरांत युद्धबंदी जाहीर झालीय?
युद्धाचा सर्वाधिक परिणाम झालेल्या 6 भागांमधून सामान्य नागरिकांना बाहेर पडता यावं म्हणून रशिया 12 तासांच्या युद्धबंदीसाठी तयार झाल्याचं युक्रेनच्या उप-पंतप्रधानांनी म्हटलंय.
युक्रेनच्या स्थानिक वेळेनुसार सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत युद्धविरामासाठी रशिया तयार झाल्याचं इरिना वेरेश्चुक यांनी म्हटलंय.
या काळात पुढील शहरांमध्ये नागरिकांच्या सुरक्षित प्रवासासाठीचे (Evacuation) कॉरिडोर खुले असतील.
- मारिओपोल ते झापोरीझझिया
- एनरहोदर ते झापोरीझझिया
- सुमी ते पोल्तावा
- इझयम ते लोझोवा
- वोल्नोवखा ते पोक्रोवश्क (दोनेत्स्क)
- आणि कीव्ह भोवतीच्या वॉर्झेल, बोरोडायंका, बुका, इरपिन आणि होस्तोमेल पासून राजधानीपर्यंत.
या काळात रशियाच्या सेना शांतता पाळतील असं रशियाच्या नॅशनल डिफेन्स कंट्रोल सेंटरचे प्रमुख मिखाईल मिझिनस्तेव यांनी म्हटलंय.
युक्रेनी नागरिक रशियाशी लढण्यासाठी पेट्रोल बॉम्ब आणि देवाचा का आधार घेतायत?
YouTube पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
नाटो काय आहे? रशियाचा नाटोवर विश्वास का नाही? भारत नाटोचा सदस्य आहे का?
पोलंडमधून भारतीय विद्यार्थी कसे बाहेर पडतायत?
व्हीडिओ कॅप्शन, Ukraine Russia War : पोलंडमधून भारतीय विद्यार्थी कसे बाहेर पडतायत? रशियाचा युक्रेनवर हल्ला : आजच्या दिवसात आतापर्यंत काय घडलं?
नमस्कार मी अमृता दुर्वे,
रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा आजचा चौदावा दिवस आहे. याविषयीचे लाईव्ह अपडेट्स, व्हिडिओज, नकाशे आणि विश्लेषण या पानावरून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.
या आहेत आता पर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडी :
- युक्रेनच्या अनेक शहरांवर रशियाचे हल्ले सुरूच आहेत. आतापर्यंत 20 लाख लोकांनी युक्रेनमधून पळ काढलाय.
- सुमी शहरातील ह्यूमन कॉरिडॉर मंगळवारप्रमाणे आजही खुला असणार आहे. काल या कॉरिडॉरच्या माध्यमातून 5000 लोकांनी शहर सोडलं होतं. यामध्ये 694 भारतीय विद्यार्थी होते.
- रशियाच्या आक्रमणानंतर युक्रेनच्या 2 दशलक्ष नागरिकांनी स्थलांतर केलं आहे, यामध्ये 800,000 लहान मुलांचा समावेश आहे असं 'सेव्ह द चिल्ड्रन' संस्थेनं म्हटलं आहे.
- अमेरिकेतील टीव्ही चॅनेल एबीसीला दिलेल्या मुलाखतीत झेलेन्स्की यांनी अनेक मुद्यांवर विस्तृतपणे भूमिका मांडली. 'आपण रशियाशी चर्चा करण्यासाठी तयार आहे. नेटो आम्हाला संघटनेत सामील करण्यासाठी तयार नसल्याचं स्पष्ट झालं. शरणागती पत्करून एखाद्या गोष्टीसाठी आर्जव करणारा मी राष्ट्राध्यक्ष होऊ इच्छित नाही,' असं झेलेन्स्की यांनी सांगितलं.
- युक्रेनची राजधानी कीव्ह आणि आसपासच्या भागांमध्ये जोरदार बॉम्बहल्ले होत झाले.
- रशियाने युक्रेनविरुद्ध युद्ध पुकारल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. तेल कंपन्या किंमत ठरवतील असं केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितलं. तेलाची टंचाई होणार नाही आणि जनतेच्या हिताचा निर्णय घेतला जाईल असं ते म्हणाले.
- ऑस्ट्रेलियातील ऊर्जा कंपनीनं रशियातून तेल आयात थांबवली. रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाने हा मोठा निर्णय घेतलाय.
- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अमेरिका यापुढे रशियाकडून कच्चं तेल, नैसर्गिक वायू आणि कोळसा आयात करणार नसल्याच जाहीर केलं आहे.
युक्रेनमध्ये अडकलेल्यांचं लक्ष सुटकेच्या मार्गांकडे
रशियाने ताब्यात घेतलेल्या शहरांमधून लोकांच्या पहिल्या जथ्थ्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आल्यानंतर आता युक्रेनमधून बाहेर पडण्याची इच्छा असलेल्या सगळ्यांचं लक्ष या मोहिमांकडे आहे.
24 फेब्रुवारीला रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यापासून आतापर्यंत 20 लाख लोकांनी देश सोडला आहे. साधारण 40 लाख लोक युक्रेन सोडतील असा अंदाज युनायटेड नेशन्सच्या रेफ्युजी एजन्सीने वर्तवला आहे.
युक्रेनमधून सर्वाधिक लोक शेजारच्या पोलंडमध्ये गेले आहेत.

युक्रेनमध्ये 'Z' अक्षराची दहशत
इंग्रजीतलं शेवटचं अक्षर 'Z' (झेड) सध्या चर्चेत आहे. युक्रेनमधल्या युद्धादरम्यान रशियन फौजा या अक्षराचा वापर करत आहेत. पण हे अक्षर इतकं महत्त्वाचं का बनलं आहे? वाचा अधिक

फोटो स्रोत, Getty Images
युक्रेनच्या कलाकाराचा रशियाच्या हल्ल्यात मृत्यू

फोटो स्रोत, PASHA LEE/INSTAGRAM
फोटो कॅप्शन, पाशा ली युक्रेनमधील अभिनेता आणि टीव्ही निवेदक पाशा ली याचा रशियाने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला. रशियाच्या फौजांनी इरपिन शहरावर जोरदार हल्ले केले होते.
33 वर्षीय ली यांनी युक्रेनच्या लष्करात सहभागी करण्याचा निर्णय घेतला होता.
ली यांनी अनेक चित्रपटात काम केलं होतं. द लायन किंग आणि रशियन इन्व्हेशनच्या युक्रेन आवृत्तीत ली यांनी व्हॉईस ओव्हर दिला होता.
शोधपत्रकार व्हिक्टर दुदार यांचा रशियाने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला.
रशिया-युक्रेनच्या मंत्र्यांमध्ये टर्कीत चर्चा

फोटो स्रोत, SUBMITTED PHOTO
फोटो कॅप्शन, रशियाने युक्रेनवर आक्रमण करून 14 दिवस झाले आहेत. रशियाचे परराष्ट्र मंत्री सजी लॅव्हरोव्ह आणि युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दाम्युट्रो कुलेबा हे एकमेकांची टर्कीत भेट घेणार आहेत. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून दोन्ही देशांचे परराष्ट्रमंत्री पहिल्यांदाच भेटत आहेत.
नागरिकांना सुरक्षितपणे अन्य देशात जाता यावं यासाठी युक्रेनमधील अनेक शहरांमध्ये ह्यूमन कॉरिडॉर तयार करण्यात आल्याचं रशियाने सांगितलं आहे.
पोलंडने युक्रेनला लढाऊ विमानं द्यावीत हा प्रस्ताव अमेरिकेने फेटाळला आहे. अमेरिकेच्या जर्मनीतल्या एअरबेसच्या माध्यमातून ही विमानं दिली जावीत असा प्रस्ताव होता.
युकेने रशियावर आणखी निर्बंध लागू केले आहेत. अमेरिकेने रशियातून आयात होणाऱ्या तेलावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
मॅकडोनाल्ड, स्टारबक्स आणि कोका कोला या कंपन्यांनी रशियातील व्यवहार थांबवले आहेत.
सुमी शहरातील ह्यूमन कॉरिडॉर आजही सुरू राहणार

फोटो स्रोत, Getty Images
फोटो कॅप्शन, सुमी शहराला रशियाने लक्ष्य केलं होतं. सुमी शहरातील ह्यूमन कॉरिडॉर मंगळवारप्रमाणे आजही खुला असणार आहे. काल या कॉरिडॉरच्या माध्यमातून 5000 लोकांनी शहर सोडलं होतं. यामध्ये 694 भारतीय विद्यार्थी होते. ही मुलं वैद्यकीय शिक्षणासाठी या शहरात आहेत. आता ही मुलं लविव शहराकडे रवाना झाली आहेत.
यापैकी एक आशिक सरकार यांनी बीबीसी प्रतिनिधी अभिनव गोएल यांच्याशी बोलताना सांगितलं की, "आम्ही सगळे आता ट्रेनमध्ये आहोत. आम्ही आधी पोल्तोव्हा इथे आलो. तिथे उतरून ट्रेन पकडली. ट्रेन लविव शहराकडे जात आहे. लविवइथून आम्ही युक्रेनच्या पोलंडशी संलग्न सीमेकडे जात आहेत".
सोमवारी या शहरात झालेल्या हल्ल्यात 22जणांचा मृत्यू झाला होता.
रशिया-युक्रेन युद्धाचे भारतावर हे '3' परिणाम होणार

