चंद्रयान-3चं यशस्वी लँडिंग, नरेंद्र मोदींनी दक्षिण आफ्रिकेतून इस्रो प्रमुखांना फोन करून म्हटलं...
चंद्रयान- 3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे सॉफ्ट लँडिंग केलं आहे. असं करणारा भारत जगातला पहिलाच देश ठरला आहे.
लाईव्ह कव्हरेज
नासा आणि ESA ने केलं अभिनंदन
चंद्रयान-3 च्या यशाबद्दल नासा आणि युरोपियन अंतराळ संस्थेनं इस्रोचं अभिनंदन केलं.
नासाचे प्रशासक बिल नेल्सन यांनी ट्विटरवर इस्रोचं ट्वीट शेअर करत म्हटलंय की, "चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग केल्याबद्दल इस्रोचे अभिनंदन. चंद्रावर यशस्वीपणे सॉफ्ट लँडिंग करणारा चौथा देश बनल्याबद्दल भारताचे अभिनंदन. या मोहिमेत तुमचा साथीदार बनून आम्हाला खूप आनंद होत आहे."
X पोस्टवरून पुढे जा, 1परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) ने सुद्धा या यशाबद्दल इस्रोचे अभिनंदन केले आहे.
ईएसएचे प्रमुख जोसेफ एस्बॅकर यांनी "अवर्णनीय!" म्हणत इस्रोसह भारताचे अभिनंदन केलंय.
X पोस्टवरून पुढे जा, 2परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
चंद्राबद्दलच्या 'या' 5 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?
प्रज्ञान रोव्हर लँडरमधून बाहेर कधी येईल?
चंद्रयान-3 चंद्रावर यशस्वीरित्या पोहोचल्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) प्रमुख एस. सोमनाथ यांनी पत्रकार परिषद घेऊन या मोहिमेची महत्त्वाची माहिती दिली आहे.
चंद्रयान-3 मिशनचे लँडर चंद्रावर पोहोचलं आहे. या लँडरमध्ये एक रोव्हर देखील आहे, जो चंद्राचा अभ्यास करेल. या रोव्हारचं नाव प्रज्ञान आहे.
एस. सोमनाथ म्हणाले की, "प्रज्ञान रोव्हर लवकरच बाहेर येईल आणि त्याला एक दिवसही लागू शकतो. त्यातून रेडिओ ऍनाटॉमी ऑफ मून बाउंड हायपरसेन्सिटिव्ह आयनोस्फियर अँड अॅटमॉस्फियर (RAMBHA) सह अनेक उपकरणेही बाहेर येतील. RAMBHA चंद्राच्या वातावरणाचा अभ्यास करेल."
"हा रोव्हर दोन महत्त्वाचा अभ्यास करेल, ज्यामध्ये प्रथम लेझरच्या साह्याने त्या जमिनीचा अभ्यास केला जाईल. यासोबतच त्याचे रसायनशास्त्र जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाईल."
इस्रोच्या प्रमुखांनी सांगितले की, या मोहिमेतील सर्वात कठीण काळ हा उपग्रह अवकाशात नेण्याचा होता आणि त्यानंतर दुसरा कठीण काळ तो चंद्रावर उतरवण्याचा होता.
यासोबतच त्यांनी अमेरिकन अंतराळ संस्था 'नासा'सह ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनच्या ग्राउंड स्टेशनचेही आभार मानले. सोमनाथ यांनी सांगितले की, अनेक परदेशी संस्थांनीही यामध्ये मदत केली, त्यामुळे या मोहिमेत यश मिळाले.

चंद्रयान-3 यशस्वी लँडिंगनंतर चंद्रावर 14 दिवस काय-काय करणार?
राहुल गांधी यांनी केलं इस्रोच्या टीमचे अभिनंदन

VIDEO : मोदींनी केला इस्रो प्रमुखांना फोन
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गहून इस्रोचे प्रमुख सोमनाथ यांना फोन करून अभिनंदन केलं.
मोदी हे सध्या जोहान्सबर्गमध्ये ब्रिक्स परिषदेसाठी गेले आहेत.
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
चंद्रयान 3 LIVE : ऐतिहासिक! चंद्रयान दक्षिण ध्रुवावर उतरलं, आता काय घडणार?
चंद्रयान 3: चंद्रावर आजवर कुणी-कुणी पाऊल ठेवलंय? फक्त 2 नाही, 12 जण आहेत
चंद्रयान-3ः चंद्राबद्दलच्या या 10 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?
भारताचं चंद्रावर ऐतिहासिक पाऊल!

चंद्रयान-3 : चंद्रावर उतरलेली 'ही' 6 चाकी गाडी तिथे काय-काय करणार?
चंद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगनंतर इस्रोचं आनंदानं भरलेलं रंजक ट्वीट
इस्रोने सुद्धा एक रंजक ट्वीट केलं आहे.
चंद्रयान 3 म्हणतंय, "भारत देशा, आम्ही आमच्या इप्सित स्थळी पोहोचलो आहोत."
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
इस्रोच्या पूर्ण टीमचे आभार - इस्रो प्रमुख
चंद्राच्या ध्रुवावर जाणारे आपण पहिले आहोत. मी सगळ्या टीमचे प्रचंड आभार मानतो. इस्रोच्या सगळ्या मॅनेजमेंटचं आभार मानतो अशी प्रतिक्रिया चंद्रयान 3 च्या प्रमुखांनी दिली आहे.

फोटो स्रोत, ISRO
'या मोहिमेच्या यशामुळे वैज्ञानिक समुदायाला नवी उभारी मिळाली आहे'
चंद्रयान 3 चे यशस्वी लँडिग झाल्यानंतर आता प्रतिक्रियांचा ओघ सुरू झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विटरवर प्रतिकिया दिली आहे.
ते म्हणाले, "चंद्रयान 3 हा अंतराळातला भारताचा सगळ्यात मोठा प्रयत्न आहे. या मोहिमेच्या यशामुळे वैज्ञानिक समुदायाला नवी उभारी मिळाली आहे. सर्व भारतीयांना शुभेच्छा."
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
चंद्रयान-3चं यशस्वी लँडिंग
- चंद्रयान-3चं यशस्वी लँडिंग, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणारा भारत ठरला पहिलाच देश
- चांद्रयान- 3 च्या यशस्वी लँडिंगनंतर संपूर्ण भारतात सेलिब्रेशन
- चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चंद्रयान-3 चं यशस्वी लँडिंग
- चंद्रावर लँडिंग करणारा भारत चौथा देश, आतापर्यंत अमेरिका, रशिया आणि चीनने केलं आहे लँडिंग
- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीयांना दिल्या शुभेच्छा
- हा क्षण अभूतपूर्व आहे, हा क्षण नव्या भारताच्या जयघोषाचा आहे - नरेंद्र मोदी
LIVE TV : ऐतिहासिक... भारत चंद्रावर उतरला!
YouTube पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
चंद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगबद्दल 140 कोटी भारतीयांचं अभिनंदन - मोदी
नरेंद्र मोदी सध्या ब्रिक्स परिषदेसाठी दक्षिण आफ्रिकेत आहेत. चंद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांचं अभिनंदन केलं.
दक्षिण आफ्रिकेतून मोदींनी भारतीयांशी संवाद साधला.
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
ब्रेकिंग, चंद्रयान-3चं यशस्वी लँडिंग, चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत ठरला पहिलाच देश
चंद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागापासून 1 किलोमीटर अंतरावर

फोटो स्रोत, ISRO