You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

उत्तर प्रदेशाचे 2022चे निकाल 2024 चं भवितव्य ठरवतील - मोदी

उत्तर प्रदेशात भाजपनं जोरदार आघाडी घेतली असून, उत्तराखंड आणि गोव्यातही भाजपची आगेकूच सुरू आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्षानं आघाडी घेतली आहे.

लाईव्ह कव्हरेज

अमृता दुर्वे and तुषार कुलकर्णी

  1. केजरीवालांना 7 वर्षांत जे जमलं, ते राज ठाकरेंना 16 वर्षांत का जमलं नाही?

  2. योगी आता शहांऐवजी भाजपचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते झालेत का?

  3. भगवंत मान : ‘दारूच्या आहारी गेलेले नेते’ ते पंजाबचे मुख्यमंत्री

  4. चरणजीत सिंग चन्नींचा पराभव करणारे लाभ सिंग कोण आहेत?

  5. भाजपच्या विजयाने 2024 च्या लोकसभा निवडणुकांसाठीची परिस्थिती अजूनच कठीण झाली - योगेंद्र यादव

    पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांचं चित्र आता पुरेसं स्पष्ट झालं आहे. उत्तरप्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोव्यात भाजप विजयी झालं आहे, तर पंजाबमध्ये आम आदमी पार्टीला मोठा विजय मिळाला आहे.

    दरम्यान, या निकालांच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या राजकीय तज्ञांच्या, पक्षाशी संबंधित नेते मंडळींच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. यात आता राजकीय कार्यकर्ते आणि एकेकाळी आम आदमी पक्षाशी संबंधित असलेले योगेंद्र यादव म्हणाले, "हा निकाल निराशाजनक आहे मात्र तसा आश्चर्यकारक नाही."

    शेतकरी आंदोलनात सहभागी असणारे योगेंद्र यादव म्हणाले, "हे निकाल म्हणजे भारताचा आत्मा वाचवण्याच्या लढ्याला बसलेला हादरा आहे. आणि आताचे निकाल पाहता 2024 च्या लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने ही परिस्थिती फारच कठीण झाली आहे."

    भाजपच्या विजयावर एका वृत्तवाहिनीशी बोलताना योगेंद्र यादव म्हणाले, "ज्या राज्यात कोरोनामुळे शेकडो लोकांचा मृत्यू झाला, गंगेत तरंगणारी शेकडो प्रेत जगाने पाहिली, जिथं बेरोजगारी आणि महागाईचा प्रश्न अतिशय गंभीर आहे, शेतकरी मोकाट जनावरांमुळे त्रस्त आहेत, अशा ठिकाणी सत्ताधारी पक्ष मोठया मतांनी पुन्हा निवडून येतो. त्यामागे तीन मोठ्या गोष्टी आहेत. आता तुम्ही भाजपच्या या विजयावर म्हणाल की एकतर भाजपने काही चमत्कार जादूटोणा केला आहे. किंवा मग विरोधक पूर्णपणे अपयशी ठरले आहेत."

    योगेंद्र यादव यांनी या तीन गोष्टींचा खुलासा करताना सांगितलं, "भाजपने चमत्काराच्या नावाखाली सर्वांना रेशन दिल्याचं आपल्या जाहिरातीतून दाखवलं आहे. प्रसारमाध्यमांद्वारे भाजपने लोकांची मने जिंकली असून यातून विरोधक फोल ठरल्याचं दिसत आहे."

  6. पहा लाईव्ह : सुहास पळशीकरांसोबत विधानसभा निवडणूक निकालांचं सोप्या भाषेतील विश्लेषण

  7. 5 राज्यांतल्या विधानसभा निकालांचा महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?

  8. विधानसभा निवडणूक निकाल : या साडेसात मुख्यमंत्र्यांना मतदारांनी दाखवला घरचा रस्ता

  9. ब्रेकिंग, केंद्रीय तपास यंत्रणांवर काहीजण दबाव आणतायत - पंतप्रधान नरेंद्र मोदी

    रशिया - युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरात महागाई वाढतेय असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय.

    या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या असून त्याचा इंधनावर परिणाम होणार असल्याचं मोदी म्हणाले आहेत.

    देशातल्या राजकारणावर पंतप्रधानांनी टीका केलीय.

    देशातल्या राजकारणाची पातळी घसरत असल्याचं त्यांनी म्हटलंय.

    देशातल्या लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला, कोरोना काळातल्या सरकारच्या कामावर टीका करण्यात आली असं पंतप्रधान म्हणाले आहेत. विरोधकांनी भारताच्या लशीवर शंका घेतली, ऑपरेशन गंगालाही प्रांतवादात अडकवण्यात आल्याचं ते म्हणाले.

    "आपण कोणत्याही कुटुंबाच्या विरोधात नाही, किंवा कोणा व्यक्तीशी माझं वैर नाही. पण मला लोकशाहीची काळजी आहे. पण लोकांनी लोकशाही बळकट केली. एक दिवस असा येईल जेव्हा भारतात घराणेशाहीच्या राजकारणाचा सूर्यास्त नागरिक घडवून आणतील. या निवडणुकीत देशातल्या मतदारांनी स्वतःच्या विचारांची चुणूक दाखवत काय होणार आहे, याकडे इशारा केलाय."

    "हे देशाचं दुर्भाग्य आहे की घोटाळ्यांत अडकलेले लोक एकत्र येत संस्थांवर दबाव आणत आहेत, या लोकांचा देशाच्या न्यायव्यवस्थेवरही विश्वास नाही, तपासावरही ते दबाव आणतात, " असं पंतप्रधानांनी म्हटलं.

    "कोणत्याही भ्रष्टाचाऱ्यावर कारवाई होताच हे लोक त्याला धर्माचा - जातीचा संदर्भ लावतात. जातीचा गर्व असणाऱ्या सगळ्यांना माझं आवाहन आहे. अशा भ्रष्टाचाऱ्यांना आपल्या जातीपासून - समाजापासून दूर करावं. याने समाज मजबूत होईल आणि प्रत्येकाचं भलं होईल."

  10. उत्तर प्रदेशाचे 2022चे निकाल 2024 चं भवितव्य ठरवतील - पंतप्रधान नरेंद्र मोदी

    2017च्या निकालांनी 2019च्या निवडणुकीचं भवितव्य ठरवलं, असं जाणकार म्हणाले होते. त्याचप्रमाणे 2022चे निकाल2024 चं भवितव्य ठरवतील असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय.

    'जिथे डबल इंजिनचं सरकार होतं, तिथे विकास झाला. केंद्रात आणि राज्यात सरकार असण्याचे फायदे असल्याचं' पंतप्रधान मोदींनी म्हटलंय.

    निवडणूक निकालांमध्ये माता-भगिनी आणि लेकींचा मोठा वाटा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय.

    विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेल्या यशानंतर दिल्लीतल्या मुख्यालयातल्या विजयोत्सवात ते बोलत होते.

    प्रत्येक गरीबापर्यंत सरकारी योजना पोहोचवण्याला आपलं प्राधान्य असणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.

    भाजपने प्रशासन यंत्रणा मजबूत केली आणि कामकाजात पारदर्शकता आणल्याने हे यश मिळाल्याचंही पंतप्रधानांनी म्हटलंय.

    "ज्ञानी लोक उत्तर प्रदेशाच्या जनतेकडे फक्त जातीयवादाच्या दृष्टीकोनातून बघत होते. हा त्या जनतेचा आणि संपूर्ण उत्तर प्रदेशाचा अपमान आहे. उत्तर प्रदेशातल्या लोकांनी दाखवून दिलं की त्यांना विकासाचं राजकारण हवंय. युपीतल्या गावातल्या गरीबाने, शिक्षित वा अशिक्षिताने हे दाखवून दिलंय की जाती या देशाला जोडण्यासाठी असाला हव्यात, तोडण्यासाठी नाहीत. त्यांनी निवडणुकीत हे करून दाखवलं.

    पंजाबच्या कार्यकर्त्यांचंही मोदींनी कौतुक केलं. पंजाबमध्ये भाजप एक शक्ती म्हणून पुढे येत असल्याचं ते म्हणाले.

  11. पहा : LIVE 3 गोष्टी पॉडकास्ट: योगी आदित्यनाथ मोदींनंतर भाजपमध्ये नंबर दोनचे नेते झालेत का?

  12. गरीबांचा विकास हेच भाजपचं उद्दिष्टं, निकालांनी त्यावर शिक्कामोर्तब केलं - पंतप्रधान मोदी

    उत्तर प्रदेशात भाजपला मोठं यश मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतल्या भाजप मुख्यालयात दाखल झाले आहे.

    पक्षाला मिळालेल्या यशासाठी आपण जनतेचे आभार मानत असून आजचा दिवस हा उत्सवाचा आणि उत्साहाचा असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय.

    सर्व मतदार आणि कार्यकर्त्यांचे त्यांनी आभार मानलेत.

    यावर्षी होळीचा उत्सव 10 तारखेलाच करू असं आश्वासन आपल्याला कार्यकर्त्यांनी दिलं होतं, आणि त्यांनी ते पूर्ण केल्याचं मोदी म्हणाले.

    पक्षातल्या प्रत्येक कार्यकर्त्याने अथक परिश्रम घेतले आणि विजयी चौकार लगावल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले.

    "उत्तर प्रदेशात 5 वर्षं कार्यकाळ पूर्ण करणारा मुख्यमंत्री पुन्हा निवडून येण्याची ही पहिली घटना आहे, तर 37 वर्षांनी एखाद्या पक्षाचं पुन्हा सरकार येतंय."

    गरीबांचा विकास हेच भाजपचं उद्दिष्टं आहे आणि आजच्या निकालांनी त्यावर शिक्कामोर्तब केल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

  13. आम्ही आमच्या कष्टांचं रूपांतर मतांमध्ये करण्यात यशस्वी झालो नाही - काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी

    जनतेचा निर्णय सर्वोच्च असल्याचं कांग्रेस पक्षाच्या महासचिव प्रियांका गांधींनी म्हटलंय. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये पक्षाची सूत्रं प्रियांकाच्या हाती होती.

    पक्षाच्या पराभवाबद्दल प्रियांका गांधींनी ट्वीट करत म्हटलंय, "लोकशाहीमध्ये जनतेचं मत सर्वोच्च असतं. आमच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी मेहनत घेतली, एकत्र येत जनतेच्या मुद्द्यांसाठी संघर्ष केला. पण आम्ही आमच्या कष्टांचं रूपांतर मतांमध्ये करण्यात यशस्वी झालो नाही. काँग्रेस पक्ष सकारता्मक अजेंड्यावर चालत राहील आणि उत्तर प्रदेशाचा सुधार आणि लोकांच्या भल्यासाठी संघर्ष करणाऱ्या विरोधी पक्षाचं काम संपूर्ण जबाबदारीनिशी पार पाडेल."

  14. विधानसभा निवडणूक निकालांचा महाराष्ट्रावर काय परिणाम होईल? ऐका ट्विटर स्पेस

    भाजपने उत्तर प्रदेश सलग दुसऱ्यांदा जिंकलंय. तर पंजाबमध्ये आप'ने मुसंडी मारलीय. याचा राष्ट्र आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होईल? जाणून घेऊयात बीबीसी मराठीच्या #TwitterSpaces मध्ये. आज गुरुवारी रात्री 9.15 वाजता

    ट्विटर स्पेस ऐकण्यासाठी - https://twitter.com/i/spaces/1zqJVBWdkRMJB

  15. 5 राज्यातील विधानसभा निवडणूक निकाल, कुठे कोणाचं सरकार येणार?

    5 राज्यांतल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आता काही तासांमध्ये स्पष्ट होतील. पण सध्याचे कल पाहता उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि मणिपूरमध्ये भाजपचं सरकार येणार असं दिसतंय.

    पंजाबात आम आदमी पार्टीला मोठं बहुमत मिळालंय. तिथे ते सरकार स्थापन करण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार कोणत्या राज्यात कुठल्या पक्षाची परिस्थिती काय आहे, ते पाहूयात.

    उत्तर प्रदेश

    उत्तर प्रदेशातल्या 403 विधानसभा जागांपैकी भाजप 251 जागांवर आघाडीवर आहे किंवा जिंकलेली आहे. तर 115 मतदारसंघात समाजवादी पक्ष जिंकलाय किंवा आघाडीवर आहे. बहुजन समाज पक्षाला 1 आणि काँग्रेसला 2 जागा मिळण्याची चिन्हं आहेत. अपना दलाला (सोनेलाल) 12 जागा मिळण्याची शक्यता आहे.

    पंजाब

    117 जागा असलेल्या पंजाब विधानसभेमध्ये आम आदमी पार्टीला 92 जागी आघाडी वा विजय मिळाला आहे. तर 18 जागी काँग्रेस आघाडीवर आहे किंवा जिंकलेली आहे. शिरोमणी अकाली दलाला 3 तर भाजपला 2 जागा मिळताना दिसतायत.

    उत्तराखंड

    उत्तराखंडमधल्या 70 विधानसभा जागांपैकी 47 जागांवर भाजप जिंकलेली आहे किंवा आघाडीवर आहे. तर 19 जागी काँग्रेस आघाडीवर आहे किंवा जिंकतेय. 2 जागा भाजपला मिळताना दिसतायत.

    गोवा

    गोव्यात 40 विधानसभा मतदानसंघ आहेत. यापैकी 20 जागांवर बाजी मारत भाजप सरकार स्थापन करण्याची शक्यता आहे. इथे काँग्रेसला 11 जागा मिळण्याची शक्यता आहे. आम आदमी पार्टीला इथे 2 जागा मिळाल्या आहेत.

    मणिपूर

    60 जागा असणाऱ्या मणिपूर विधानसभा मतदारसंघातल्या 29 जागी भाजप आघाडीवर वा विजयी आहे. इथे 4 जागा काँग्रेसला मिळताना दिसतायत. तर जनता दल युनायटेड 7 जागांवर विजयी किंवा आघाडीवर आहे.

  16. मणिपूर विधानसभा निवडणूक निकाल : कोणत्या पक्षाला किती जागा?

  17. गोव्यातल्या विजयानंतर भाजपची पत्रकार परिषद, पहा Live

  18. उत्तर प्रदेशातल्या विजयानंतर योगी आदित्यनाथांची सभा

    उत्तर प्रदेश विधानसभेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्त्वाखालील भाजप बहुमताने सरकार स्थापन करण्याच्या दिशेने वाटचाल करतंय. विजय दृष्टीपथात आल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी माध्यमांशी संवाद साधला.

    जनतेचे आभार मानताना योगी आदित्यनाथ म्हणाले, "पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्त्वाखाली उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये भाजप प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करणार आहे. आदरणीय पंतप्रधानांचे, आदरणीय राष्ट्रीय अध्यक्षांचे, गृहमंत्री आणि संरक्षणमंत्र्यांचं मी अभिनंदन करतो."

    "संपूर्ण देशाच्या आणि जगाच्या नजरा उत्तरप्रदेशच्या निकालाकडे लागल्या होत्या. उत्तर प्रदेशात प्रचंड बहुमत दिल्याबद्दल जनतेचे मनःपूर्वक अभिनंदन करतो, तसेच त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. सामान्य कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळेच आज भारतीय जनता पक्षाला सरकार स्थापन करण्याची संधी मिळाली आहे. मतमोजणीबाबत भ्रामक प्रचार केला जात होता, मात्र उत्तर प्रदेशातील जनतेने भारतीय जनता पक्षालाच विजय मिळवून दिला आहे."

  19. या देशाला हिंदू-मुस्लिम राजकारणाची गरज आहे की विधायक राजकारणाची? काँग्रेसचा सवाल

    उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मणिपूर विधानसभा निवडणुकीत झालेल्या काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर पक्षाचे प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेऊन, काँग्रेसला गांभीर्याने आत्मपरीक्षण करण्याची गरज बोलून दाखवली.

    या पत्रकार परिषदेत सुरजेवाला म्हणाले की, "हा निकाल फक्त पाच राज्यांपुरता मर्यादित विषय नाहीत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला अधिक मेहनत करण्याची गरज आहे."

    ते पुढे असं ही म्हणाले की, "एका निवडणुकीचा दुसऱ्या निवडणूकीशी संबंध जोडता येणार नाही. काँग्रेसच्या तळातल्या कार्यकर्त्यापासून ते मोठ्या नेत्यापर्यंत सर्वांनीच आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे."

    यावेळी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलावर असल्याचं ही त्यांनी सांगितलं.

    रणदीप सुरजेवाला म्हणाले की, "या देशात धर्मांधता, जातीय विभाजन, हिंदू-मुस्लिम अशा राजकारणाची गरज आहे की विधायक राजकारणाची ? काँग्रेसने नेहमीच विधायक राजकारण करण्याचा प्रयत्न केला आहे, पण यश मिळाले नाही. आणि तरीही याच मुद्द्यांवरच काँग्रेस पक्ष नेहमी काम करेल."

    उत्तर प्रदेशात आम्ही पक्षाला जीवनदान देण्याचा प्रयत्न करत आहोत. धार्मिक मुद्द्यांवरून रंगलेली निवडणूक आम्ही मूलभूत मुद्द्यांच्या आधारे लढविण्याचा प्रयत्न केला. पण या मुद्द्यांवर कुठेतरी भावनिक समस्यांचाच वरचष्मा राहिलेला दिसला."

    सुरजेवाला म्हणाले, "पक्ष बळकट करण्यासाठी आम्ही संघटनात्मक पातळीवर काम करू. सोनिया गांधी लवकरच काँग्रेस कार्यकारिणीची बैठक घेणार आहेत. आम्ही निवडणूक हरलो आहोत पण आमच्यातील हिंमत अजून हरली नाही. आम्ही नवीन रणनीती घेऊन परत येऊ."

  20. शिवसेनेने लढवली तीन राज्यांमध्ये निवडणूक, अन्...