बिहार निवडणूकः पंतप्रधान मोदींने मानले बिहारच्या जनतेचे आभार
बिहार विधानसभा निवडणुकीत तेजस्वी यादव आणि नितीश कुमार यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळाली आहे.
लाईव्ह कव्हरेज
बिहारमध्ये 202 जागांचे निकाल जाहीर, कोणाच्या खात्यात किती जागा?
बिहार निवडणुकीच्या निकालासंदर्भातले दिवसभरातले महत्त्वाचे अपडेट्स आम्ही या लाइव्ह पेजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवले. आता या पेजमध्ये इथंच थांबत आहोत.
हे पेज शेवटचं अपडेट करत असताना निवडणूक आयोगानं 243 पैकी 202 जागांचे निकाल जाहीर केले होते, तर 41 जागांचे कल समोर येत होते. भाजपनं 60 जागांवर विजय मिळवला होता, तर आरजेडी 64 जागांवर विजयी झाली होती. जेडीयूनं 33 जागांवर विजय मिळवला होता.
कोरोनामुळे मतदान केंद्रांची वाढलेली संख्या आणि मतमोजणीत झालेले बदल यामुळे निकाल लागण्यास यावेळेस उशीर झाला, पहाटेपर्यंत बिहार निवडणुकांंचं सर्व चित्र स्पष्ट झालेलं असेल.
त्यावेळी संपूर्ण निकाल तसंच त्यानंतरच्या राजकीय घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.
तूर्तास थांबूया...गुड नाइट.
पंतप्रधानांनी मानले बिहारच्या जनतेचे आभार
बिहारमध्ये पंधर वर्षांनंतरही एनडीएच्याच सुशासनाला मिळालेला आशीर्वाद हेच दर्शवतो की, बिहारच्या जनतेची स्वप्नं, आशा-आकांक्षा काय आहेत, असं ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारच्या जनतेनं एनडीएला दिलेल्या कौलाबद्दल बिहारी जनतेचे आभार मानले आहेत.
X पोस्टवरून पुढे जा, 1परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
बिहारमधील प्रत्येक वर्गातील व्यक्तीने एनडीएच्या सबका साथ, सबका विकास या मंत्रावर विश्वास दाखवला असल्याचं म्हणत पंतप्रधानांनी आपण विकासासाठी निरंतर काम करत राहू असं म्हटलं आहे.
X पोस्टवरून पुढे जा, 2परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
एनडीएच्या यशाबद्दल अमित शाह यांच्याकडून अभिनंदन
बिहारमध्ये एनडीएच्या यशाबद्दल अभिनंदन करणारं ट्वीट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे.
बिहारमधील प्रत्येक वर्गानं जातिवाद आणि अनुनयाच्या राजकारणाला नाकारत एनडीएच्या विकासवादाच्या राजकारणाचा झेंडा फडकवला आहे. हा प्रत्येक बिहारवासीयाच्या आशा-आकांक्षेचा विजय आहे, असं ट्वीट अमित शाह यांनी केलं आहे.
X पोस्टवरून पुढे जा, 1परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही जनादेशाबद्दल बिहारी जनतेचे आभार मानणारं ट्वीट केलं आहे.
X पोस्टवरून पुढे जा, 2परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
काय सांगतात बिहार निवडणुकीचे आकडे?
बिहार निवडणूक निकालांमध्ये NDA आणि महागठबंधन यांच्यात प्रचंड चुरस पाहायला मिळाली. NDA ने बहुमत गाठलं तरी यात नितीश कुमारांचा खरंच विजय झाला असं म्हणता येईल का? ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रा. डॉ. सुहास पळशीकर यांचं विश्लेषण.
YouTube पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
बिहार 183 जागांचे निकाल जाहीर; कोणाला किती जागा?
बिहार विधानसभा निवडणुकीत 243 पैकी 183 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. एनडीएनं 90 जागा जिंकल्या आहेत. (भाजप-51, जेडीयू-32, व्हीपी 4, हम-3)
महागठबंधन 86 जागांवर विजयी झाले आहेत. (आरजेडी 60, काँग्रेस-14, डावे-12)
एआयएमआयएमनं 4 जागा जिंकल्या आहेत. एका जागेवर बीएसपी विजयी झाली आहे. तर एक अपक्ष आमदारही विजयी झाला आहे.
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाला एका जागेवर विजय
चिराग पासवान यांची लोकजनशक्ती पार्टी एका जागेवर विजयी झाली आहे.
सकाळी आठ वाजल्यापासून सुरू झालेल्या मतगणनेत एलजेपीला आतापर्यंत एकही जागा मिळाली नव्हती.
निवडणूक आयोगानं जी ताजी आकडेवारी प्रसिद्ध केली आहे, त्यामध्ये चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाला एका जागेवर विजय मिळाल्याचं दिसत आहे.

फोटो स्रोत, ECI
बिहार निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना 'नोटा'पेक्षाही कमी मतं
मतमोजणीत गडबडीवर निवडणूक आयोगाचं काय आहे म्हणणं?
बिहार विधानसभा निवडणुकीत मतमोजणीत गडबड केल्याचा आरोप केल्यानंतर आरजेडी आणि काँग्रेस निवडणूक आयोगाकडे पोहोचले आहेत.
एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या बातमीनुसार आरजेडी आणि काँग्रेसचं शिष्टमंडळ पटण्यामध्ये निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले असून मुख्यमंत्री नितीश कुमार मतमोजणीच्या प्रक्रियवेर प्रभाव टाकत असल्याचं त्यांनी म्हटलं.
X पोस्टवरून पुढे जा, 1परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
या आरोपांबद्दल बोलताना निवडणूक आयोगानं म्हटलं की, एका पक्षानं 119 जागा जिंकल्याचा दावा केला आहे, मात्र आतापर्यंत 146 जागांवरचे निकाल जाहीर झाले असून उर्वरित 97 जागांवरील कल समोर आले आहेत.
निवडणूक आयोगाचे सेक्रेटरी जनरल उमेश सिन्हांनी पत्रकार परिषदेत म्हटलं, "निवडणूक आयोग सर्व प्रक्रियेचं पालन करुनच काम करत आहे. निवडणूक आयोग कोणाच्याही दबावाखाली येऊन काम करत नाहीये. काही ठिकाणी अंतिम टप्प्यातील मतमोजणी अजून सुरू आहे, आयोगाचे पर्यवेक्षक सर्व परिस्थितीवर नजर ठेवून आहेत.
X पोस्टवरून पुढे जा, 2परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
बिहार निवडणुकीतील भाजपच्या कामगिरीमुळे देवेंद्र फडणवीसांचे राजकीय वजन वाढेल का?
आरजेडीकडून 119 जागांवर विजय मिळवल्याचा दावा
राष्ट्रीय जनता दलानं आपण 119 जागांवर विजय मिळवल्याचा दावा केला आहे. आरजेडीनं मतमोजणीत गडबडीचा आरोपही केला आहे.
'ही त्या 119 जागांची यादी आहे, जिथे मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर महागठबंधनचे उमेदवार विजयी झाले आहेत. रिटर्निंग ऑफिसरने विजयाबद्दल त्यांचं अभिनंदनही केलं आहे. मात्र आता सर्टिफिकेट देत नाहीयेत. तुमचा पराभव झाला, असं सांगत आहेत.
X पोस्टवरून पुढे जा, 1परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
119 जागा जिंकल्यावर टीव्हीवर 109 जागा दाखवल्या जात आहेत. नितीश कुमार सर्व अधिकाऱ्यांना फोन करून गडबड करत आहेत. अंतिम निकाल आल्यावर आणि शुभेच्छा दिल्यावर आता तुम्ही हरला आहात, असं सांगितलं जात असल्याचंही आरजेडीनं ट्वीट करून म्हटलं आहे.
X पोस्टवरून पुढे जा, 2परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
बिहार निवडणुकीत विजयाचा लाडू कोणाला मिळणार?- आजचं कार्टून

तेज प्रताप, तेजस्वी यादव विजयी
आरजेडीचे नेते आणि महागठबंधनचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार तेजस्वी यादव राघोपूर मतदारसंघातून विजयी झाले आहेत.
त्यांनी भाजपचे उमेदवार सतीश कुमार यांना 27, 839 मतांनी पराभूत केलं आहे.
तेजस्वी यांचे भाऊ तेज प्रताप यादव यांनी हसनपूर विधानसभा मतदारसंघातून जेडीयूचे उमेदवार राज कुमार राय यांचा पराभव केला आहे.
इमामगंज मतदारसंघातून हम पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी आरजेडी उमेदवार उदय नारायण चौधरी यांना 16,034 मतांनी पराभूत केलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
नितीश कुमार यांनी उद्धव ठाकरेंकडून काय शिकावं?
संध्याकाळ झाली तरी अजूनही बिहारची मतमोजणी पूर्ण का नाही झाली?
संजय राऊत यांनी नितीश कुमारांना काय सल्ला दिला?
नितीश कुमार यांना बिहार निवडणुकीत भाजपपेक्षा कमी जागा मिळत असल्याचं ताज्या कलावंरून दिसतंय. त्यामुळे नितीश कुमारांना शिवसेनेसारखी संधी असल्याचं विधान संजय राऊत यांनी केलं आहे.
संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना काय म्हटलं?
YouTube पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
बिहार निवडणूकः भाजप सर्वांत मोठा पक्ष, नितीश कुमार मुख्यमंत्री होणार का?
बिहारमध्ये अटीतटीची लढत, एनडीए-महागठबंधनमधल्या जागांचं अंतर कमी

फोटो स्रोत, Getty Images
बिहार विधानसभा निवडणुकीचे कल जसजसे समोर येत आहेत, तसतशी या लढतीतली रंगत वाढत चालली आहे. भाजप-जेडीयूप्रणित एनडीएला 109 जागांवर आघाडी मिळाली असून काँग्रेस-राजदप्रणित महागठबंधन 106 जागांवर आघाडीवर आहे.
एनडीएला आतापर्यंत 11 जागांवर विजय मिळाला असून महागठबंधनला 9 जागांवर विजय मिळाला आहे.
एमआयएमआयएमनं एका जागेवर विजय मिळवला असून चार जागांवर ते आघाडीवर आहेत. बहुजन समाज पार्टी एका जागेवर आघाडीवर आहे.
संध्याकाळी सहा वाजता निवडणूक आयोगानं प्रेस कॉन्फरन्स घेतली, साडेपाच वाजेपर्यंत 2.7 कोटी ईव्हीएम मतांची मोजणी झाली असल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली. या विधानसभा निवडणुकीत एकूण 4 कोटी मतदान झालं आहे.
तेजस्वी यांचं यश प्रेरणादायी- शरद पवार
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
शरद पवार यांनी म्हटलं की, बिहारमधील निवडणुकीत एका बाजूला पंतप्रधान बिहारचे मुख्यमंत्री आणि भाजपचे सर्व नेते प्रचारामध्ये होते, तर दुसर्या बाजूला एक अनुभव नसलेला तरुण नेता निवडणूक लढवत होता. त्यामुळे तेजस्वी यादव यांना जेवढ्या काही जागा मिळतायत ती त्यांची 'अचिव्हमेंट' म्हणायला लागेल.
तेजस्वी यादव यांच्या या यशामुळे तरुणांना प्रेरणा मिळेल, असंही शरद पवार यांनी म्हटलं.
बिहारमधील निवडणूक निकालाचा परिणाम इतर राज्यांवर कसा होईल हे सांगता येणार नसल्याचंही त्यांनी म्हटलं.

फोटो स्रोत, Getty Images
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
'या' चार जागांवर चुरशीची लढत, मतांमधलं अंतर 100 पेक्षाही कमी
वैकुंठपूर विधानसभा मतदारसंघ - मिथिलेश तिवारी (भाजप)- 98 मतांचं अंतर
बोधगया विधानसभा मतदारसंघ - हरी मांझी (भाजप)- 98 मतांचं अंतर
डेहरी विधानसभा मतदारसंघ - फते बहादूर सिंह (आरजेडी)- 81 मतांचं अंतर
मधुबन विधानसभा मतदारसंघ- राणा रणधीर- 84 मतांचं अंतर

फोटो स्रोत, Getty Images