अमेरिका निवडणूक 2020 : ट्रंप की बायडन- कोण मारणार बाजी?

डोनाल्ड ट्रंप व्हाईट हाऊसमध्ये आणखी 4 वर्षं राहणार की नाही हे अमेरिका लवकरच ठरवणार आहे.

लाईव्ह कव्हरेज

  1. डोनाल्ड ट्रंप मोडणार परंपरा, जो बायडन यांच्या शपथविधीला राहणार गैरहजर

  2. अमेरिका निवडणुकीचा निकाल कधीपर्यंत लागणार?

  3. अमेरिका निवडणूक 2020 : ट्रंप की बायडन- कोण मारणार बाजी?

  4. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीबद्दलच्या या काही महत्त्वाच्या गोष्टी

    - अमेरिकन राजकारणामध्ये 2 पक्षांचा सर्वांत जास्त दबदबा आहे. अमेरिकेचे आता पर्यंतचे राष्ट्राध्यक्ष डेमोक्रॅट होते वा रिपब्लिकन होते.

    - यावर्षीही राष्ट्राध्यक्ष पदाच्या स्पर्धेमध्ये याच दोन पक्षांचे उमेदवार आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रंप

    - राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक दर 4 वर्षांनी होते आणि वयाची 18 वर्ष पूर्ण केलेले नागरिक मतदानासाठी पात्र असतात.

    - सर्वांत जास्त एकूण मतं म्हणजेच पॉप्युलर व्होट्स (Popular Votes) मिळणारा उमेदवारच जिंकतो, असं नाही. दोन्ही उमेदवार जास्तीत जास्त – इलेक्टोरल कॉलेज व्होट्स जिंकण्याचा प्रयत्न करतात.

    - अमेरिकेतल्या 50 राज्यांना त्यांच्या लोकसंख्येनुसार काही इलेक्टोरल व्होट्स देण्यात आलेली आहेत. एकूण 538 इलेक्टोरल व्होट्सपैकी 270 वा अधिक इलेक्टोरल व्होट्स मिळणारा उमेदवार जिंकतो.

    - सध्या सगळं लक्ष ट्रंप आणि बायडन यांच्याकडे असलं तर याच निवडणुकीमध्ये मतदार काँग्रेसमधल्या नवीन सदस्यांचीही निवड मतपत्रिका भरताना करत आहेत.

  5. अमेरिकेत ठिकठिकाणी मतदारांच्या मोठ्या रांगा

    अमेरिकेतल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये शाळा, महाविद्यालयं, ग्रंथालयं आशा वेगवेगळ्या ठिकाणी नागरिकांनी मतदान करण्यासाठी सकाळपासून मोठ्या रांगा लावल्या आहेत.

    अमेरिका निवडणूक

    फोटो स्रोत, Getty Images

    फोटो कॅप्शन, केंटुकीमधील मतदार
    पेन्सिलव्हेनियामधली मतदार

    फोटो स्रोत, Getty Images

    फोटो कॅप्शन, पेन्सिलव्हेनियामधली मतदार
    अटलांटामधील मतदार

    फोटो स्रोत, Getty Images

    फोटो कॅप्शन, अटलांटामधील मतदार
  6. अमेरिकेतले मराठी मतदार कोणाला मत देणार – ट्रंप की बायडन?

    अमेरिकेतले मराठी मतदार कोणाला मत देणार – ट्रंप की बायडन? पाहा अमेरिकेतल्या मराठी मतदारांबरोबर बीबीसी प्रतिनिधी अमृता दुर्वे यांनी केलेली चर्चा.

  7. कमी मतं मिळवणारसुद्धा होऊ शकतो राष्ट्राध्यक्ष

    साधारणपणे कुठल्याही निवडणुकीत सर्वाधिक मतं मिळवणारा उमेदवार किंवा पक्ष विजयी ठरतात. पण अमेरिकेत असं होत नाही.

    अमेरिकेत मतदार आपलं मत देतात, तेव्हा ते मत प्रत्यक्षात थेट राष्ट्राध्यक्षाला नाही, तर डेलिगेट्स किंवा अधिकाऱ्यांच्या एका छोट्या गटाला देत असतात. याच गटाला 'इलेक्टोरल कॉलेज' असं म्हटलं जातं आणि त्यातल्या सदस्यांना इलेक्टर.

    परंपरेनुसार निवडणुकीनंतर काही दिवसांनी इलेक्टर्स एकत्र येतात आणि राष्ट्राध्यक्षांची निवड करतात.

    एखाद्या राज्यात ज्या उमेदवाराला बहुमत मिळतं, त्यानं त्या राज्यातल्या सगळ्या इलेक्टर्सची मतं जिंकली, असं मानलं जातं. इलेक्टर्सच्या या मतांना इलेक्टोरल व्होट्स असंही म्हणतात.

    त्यामुळे मतदारांची सर्वाधिक मतं (पॉप्युलर व्होट्स) मिळालेला उमेदवार नाही, तर सर्वाधिक इलेक्टोरल व्होट्स जिंकणारा उमेदवार राष्ट्राध्यक्ष बनतो.

    आता एखादं राज्य किती इलेक्टोरल व्होट्स देणार, याचा आकडाही निश्चित केलेला आहे. अमेरिकन विधीमंडळात सिनेट आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्ज ही दोन सभागृहं मिळून एखाद्या राज्यातून जितके लोकप्रतिनिधी निवडून जातात, तितकी इलेक्टोरल व्होट्स त्या राज्याच्या खात्यात येतात.

    अमेरिका मतदान

    फोटो स्रोत, Reuters

  8. अमेरिका निवडणूक निकाल : ट्रंप की बायडन- कोण आहे आघाडीवर ?

  9. अमेरिका निवडणूक : पती-पत्नी जेव्हा 2 वेगळ्या पक्षांना मतदान करतात

  10. अमेरिकेत उजाडला मतदानाचा दिवस

    अमेरिकेमध्ये आज राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठीचं मतदान होतंय.

    पण 50 राज्य असलेल्या या देशामध्ये 9 विविध टाईमझोन्स आहेत. म्हणूनच 3 नोव्हेंबरच्या दिवसामध्ये अमेरिकेच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या वेळी मतदान होईल.

    न्यू हॅम्पशायरसारख्या काही राज्यांमध्ये मतदानाला सुरुवातही झालेली आहे.

    अमेरिकेच्या पूर्वेकडे असणाऱ्या व्हरमाँटमध्येही मतदानाला पहाटे 5 वाजल्यापासून सुरुवात झालीय. इथे बर्फवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आलीय.

    1992 पासून व्हरमाँट राज्याने डेमोक्रॅट उमेदवाराला पसंती दिली होती, पण 2016मध्ये डोनाल्ड ट्रंप यांनी व्हरमाँटमध्ये बाजी मारली होती.

    अमेरिका मतदान

    फोटो स्रोत, Reuters

  11. राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीमध्ये यंदा विक्रमी मतदान होण्याचा अंदाज

    अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये आतापर्यंत 9.9 कोटींपेक्षा जास्त अमेरिकन मतदारांनी मतदान केलं असल्याचं युएस इलेक्शन्स प्रोजेक्टची आकडेवारी सांगतेय.

    पोस्टल पद्धत वापरून वा प्रत्यक्ष मतदान करत ही प्रक्रिया पार पडतेय.

    अर्ली बॅलट (Early Ballot)म्हणजे मतदानाच्या दिवसाआधीच करता येणाऱ्या मतदानाच्या प्रमाणात 2016च्या तुलनेत यावेळी मोठी वाढ झालेली आहे. 2016 च्या निवडणुकीमध्ये एकूण 13.8 कोटी अमेरिकन लोकांनी मतदान केलं होतं.

    लवकर मतदान करणाऱ्यांच्या संख्येत झालेली ही वाढ पाहता यावेळच्या निवडणुकीसाठी विक्रमी मतदान होण्याचा अंदाज जाणकार व्यक्त करतायत.

    कोरोना व्हायरसच्या साथीच्या काळामध्ये मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्यापेक्षा पोस्टाने मतपत्रिका पाठवण्याचं प्रमाण वाढल्यानेही एकूण मतदानाच्या प्रमाणात वाढ दिसून येतेय.

    राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या यापूर्वीच्या काही निवडणुकांच्या वेळी 60 टक्क्यांच्या आसपास मतदान झालं होतं. 2016मध्ये अमेरिकेतल्या मतदानासाठी पात्र असणाऱ्या लोकसंख्येपैकी 58.1 टक्के जणांनी मतदान केलं होतं.

    लवकर मतदान करण्याचं प्रमाण कॅलिफोर्निया (1.2 कोटी), टेक्सास (97 लाख) आणि फ्लोरिडा (89 लाख) या राज्यांमध्ये सर्वांत जास्त आहे.

    सर्वेक्षण चाचण्यांनुसार रिपब्लिकन समर्थकांपेक्षा डेमोक्रॅटिक पक्षाला पाठिंबा देणारे पोस्टाद्वारे मतपत्रिका पाठवायला प्राधान्य देत आहेत. जो बायडन यांच्यासाठी ही गोष्ट फायद्याची ठरू शकते.

    पण प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी म्हणजेच 3 नोव्हेंबरला केंद्रांवर जाऊन मतदान करणाऱ्यांची ‘रेड वेव्ह’म्हणजेच रिपब्लिकन समर्थकांची मोठी भरती येईल, असा दावा ट्रंप यांनी केलाय.

    US Election

    फोटो स्रोत, Getty Images

  12. डोनाल्ड ट्रंप यांचा हॉटेल व्यावसायिक ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हा प्रवास तुम्हाला माहिती आहे का?

    डोनाल्ड ट्रंप राष्ट्राध्यक्ष होण्याआधी एक अतिशय यशस्वी उद्योजक होते, आणि त्यांच्या कंपनीने मुंबईतही एक टॉवर बांधलाय. डोनाल्ड ट्रंप यांचा व्हाईट हाऊसपर्यंतचा प्रवास तुम्हाला माहीत आहे का?

  13. डोनाल्ड ट्रंप यांना अमेरिका पुन्हा संधी देईल?

    अवघ्या काही तासांत आपल्याला कळेल की अमेरिकेचा पुढचा राष्ट्राध्यक्ष कोण असणार आहे. एका बाजूला आहेत सक्रीय राजकारणात आल्यानंतर थेट राष्ट्राध्यक्ष झालेले डोनाल्ड ट्रंप आणि दुसरीकडे अनेक दशकं राजकारणात असलेले माजी उपराष्ट्राध्यक्ष जो बायडन.

    कोण जिंकेल? बायडन यांना अमेरिका संधी देईल का? की ट्रंप आणखी चार वर्षं सत्तेत राहतील? आणि ट्रंप हरले तर ते शांतपणे सत्ता सोडतील का? या सगळ्या प्रश्नांची आपण उत्तरं जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.

    YouTube पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

    YouTube पोस्ट समाप्त

  14. शेवटच्या टप्प्यातील घडामोडी

    अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीला अवघे काही तास उरले आहेत. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रंप आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन हे अगदी शेवटच्या टप्प्यातही निकरानं प्रचार करत आहेत.

    यावेळी अमेरिका निवडणुकीत फ्लोरिडा, पेन्सेल्वेनिया, मिशिगन, विसकॉन्सिन, नॉर्थ कॅरोलिना आणि अॅरिझोना ही राज्यं यावेळी टॉप बॅटलग्राउंड ठरतील असं विशेषज्ञांनी म्हटलं आहे.

    कदाचित त्यामुळेच डोनाल्ड ट्रंप हे अखेरच्या टप्प्यात नॉर्थ कॅरोलिना, मिशिगन आणि विस्कॉन्सिनला जातील. ज्यो बायडन शेवटच्या टप्प्यात पेन्सेल्वेनिया आणि ओहायोला जात आहेत.

    ट्रंप-बायडन

    फोटो स्रोत, Getty Images

    बायडन निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यांत कृष्णवर्णीयांनी आपल्याला समर्थन द्यावं यासाठी अपील करत आहेत. रविवारी (1 नोव्हेंबर)फिलाल्डेफिया राज्यातील एका रॅलीदरम्यान त्यांनी कोरोनाचा प्रभाव कृष्णवर्णीयांवर सर्वाधिक आहे.

    पेन्सल्वेनियामधील एका रॅलीमध्ये बायडन यांनी म्हटलं होतं की, कोरोना संकटाचा सामना करू शकणारे आणि अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत प्राण आणू शकणारे उमेदवार आहोत.

    जो बायडन यांनी म्हटलं होतं,“जर राष्ट्राध्यक्षांनी सुरूवातीला मास्क वापरण्यावरून थट्टा करण्याऐवजी तो घातला असता तर आपण कोणत्या अवस्थेत असतो याचा विचार करा. जवळपास सर्वच आरोग्य तज्ज्ञ माझ्याशी सहमत असतील. देशात कोरोनाचे 90 लाख रुग्ण नसते आणि दोन लाखांहून अधिक रुग्णसंख्या झाली नसती.”

    दुसरीकडे ट्रंप यांनी निवडणूक प्रक्रियेवरच आक्षेप घेतले होते. त्यांनी म्हटलं होतं की, जर निवडणुकीच्या दिवसानंतरही मतमोजणी सुरूच राहिली तर माझ्या वकिलांना यात हस्तक्षेप करावा लागेल.

    ट्रंप यांनी म्हटलं की, सर्वोच्च न्यायालयानं जर मतमोजणीची प्रक्रिया ही निवडणुकीच्या दिवशी संध्याकाळपर्यंत पूर्ण व्हायला हवी, असं म्हटलं असतं तर ते उत्तम झालं असतं. सहा-आठ दिवस वाट पाहण्यापेक्षा निकाल त्याचदिवशी लागणं चांगलं.

    वेगवेगळ्या सर्वेक्षणांनुसार डोनाल्ड ट्रंप हे प्रतिस्पर्धी बायडन यांच्या तुलनेत पिछाडीवर आहेत.

  15. डोनाल्ड ट्रंप यांना राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत आव्हान देणारे बायडन कोण आहेत?

    जो बायडन

    फोटो स्रोत, Getty Images

    जो बायडन...अमेरिकेचं सत्ताकेंद्र असलेल्या व्हाईट हाऊसमध्ये आणखी चार वर्ष घालवण्याची स्वप्न बघणाऱ्या डोनाल्ड ट्रंप यांच्या मार्गातला अडथळा असणारी ही व्यक्ती.

    3 नोव्हेंबरला अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदासाठी होत असलेल्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रंप विरुद्ध डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन अशी ही स्पर्धा असेल.

    हे जो बायडन कोण आहेत? ट्रंप यांच्यासमोर त्यांचं आव्हान किती तगडं आहे? जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा.

  16. 'स्विंग स्टेट' म्हणजे काय? राष्ट्राध्यक्ष निवडीत ही राज्यं का ठरतात महत्त्वाची?

    अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक कोण जिंकणार? डोनाल्ड ट्रंप की जो बायडन? हा प्रश्न सध्या सगळीकडे चर्चेत आहे. कारण ट्रंप किंवा बायडन जो कोणी जिंकेल, शक्तिशाली आणि श्रीमंत अमेरिकेचा पुढचा राष्ट्राध्यक्ष असेल.

    यंदाच्या निवडणुकीत 'स्विंग स्टेट' हा शब्द खूप भाव खाऊन जातोय. त्यामुळे ही राज्यं जो जिंकेल तोच निवडणूक जिंकेल आणि पुढचा राष्ट्राध्यक्ष होईल हे उघड आहे.

    'स्विंग स्टेट' म्हणजे काय आणि अशी राज्य कुठली? ही राज्यं राष्ट्राध्यक्ष कसा काय ठरवणार हेच जाणून घेऊया सोपी गोष्टमधून.

    व्हीडिओ कॅप्शन, अमेरिकन निवडणूक निकाल : ‘ही’ ७ राज्य ठरवणार अमेरिकेचा पुढचा राष्ट्राध्यक्ष #सोपी गोष्ट २००
  17. अमेरिका निवडणूक 2020 : ट्रंप की बायडन- कोण आहे मारणार बाजी?

    गुड मॉर्निंग

    डोनाल्ड ट्रंप व्हाईट हाऊसमध्ये आणखी 4 वर्षं राहणार की नाही हे अमेरिका 3 नोव्हेंबरला म्हणजे आज ठरवणार आहे.

    सध्या राष्ट्राध्यक्ष असणारे रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रंप विरुद्ध डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन अशी ही लढत आहे.

    या निवडणुकीसंबंधीचे महत्त्वाचे अपडेट्स आम्ही तुम्हाला इथे देऊ. त्याचबरोबर ही निवडणूक कशी पार पडते, निवडणुकीत कोणती राज्यं निर्णायक भूमिका बजावतात ट्रंप यांच्यासाठी ही निवडणूक का महत्त्वाची आहे, यासंबंधीचं सविस्तर विश्लेषणही इथं एका क्लिकवर वाचायला मिळेल.

  18. डोनाल्ड ट्रंप यांच्या कार्यकाळात जग कसं बदललं?

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हे फक्त त्या देशाचे नेते नसतात. कदाचित ते जगातली सर्वात सामर्थ्यवान व्यक्तीही असतात. ते काय निर्णय घेतात याचा परिणाम आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यावर होतो.

    डोनाल्ड ट्रंपही याला अपवाद नाहीत. डोनाल्ड ट्रंप यांच्या कार्यकाळात जग कसं बदललंय? जाणून घेण्यासाठी वाचा- डोनाल्ड ट्रंप यांच्या कार्यकाळात जग कसं बदललं?

    डोनाल़्ड ट्रंप