राज्यातील रुग्णांची संख्या 5 हजारच्या पुढे, मुंबई-पुण्यात लॉकडाऊनच्या सवलती रद्द

कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स

लाईव्ह कव्हरेज

  1. क्वारंटाईन, आयसोलेशन, विलगीकरण, अलगीकरण म्हणजे नेमकं काय?

  2. मोदींनी म्हटल्याप्रमाणे गरम पाणी किंवा काढा प्यायल्याने रोग प्रतिकारशक्ती खरंच वाढते का?– फॅक्ट चेक

  3. यापुढचे अपडेट्स पाहण्यासाठी...

    आज 22 एप्रिल रोजीचे अपडेट्स पाहण्यासाठी इथे क्लिक करा

    धन्यवाद.

  4. या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपण इथंच थांबत आहोत. उद्या नव्या बातम्यांसह पुन्हा भेटूया.

    धन्यवाद.

  5. कोरोनासंदर्भातील आज दिवसभरात काय घडलं?

    • मुंबई-पुण्यात लॉकडाऊनबाबतच्या सवलती महाराष्ट्र सरकारनं रद्द केलं. (याबाबत याच लाईव्हमध्ये खाली सविस्तर तुम्हाला वाचता येईल.)
    • महाराष्ट्रात आज 552 नवे रुग्ण आढळले. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 5218 वर पोहोचलीय.
    • भारतातील रुग्णांची एकूण संख्या 18 हजार 601 झालीय. भारतात आतापर्यंत 590 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला.
    • ICMR नं भारतातील सर्व राज्यांना आदेश देत रॅपिड टेस्टिंग दोन दिवसांसाठी थांबवण्यास सांगितले आहे.
  6. महाराष्ट्रातील रुग्णांची एकूण संख्या 5,218 वर पोहोचलीय

    • महाराष्ट्रात आज 552 नवे रुग्ण आढळले आहेत, तर 19 जणांचं निधन झालंय.
    • आज 150 रुग्ण बरे होऊन परतले. आजपर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 722 झालीय.
    • महाराष्ट्रातील एकूण रुग्णांची संख्या 5 हजार 218 वर पोहोचलीय.
  7. मुंबई-पुण्यात लॉकडाऊनबाबतच्या सवलती रद्द

    कोरोना विषाणूंचा वाढता फैलाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यासाठीलॉकडाऊन मध्ये आणलेली शिथिलता मुंबई महानगर क्षेत्र आणिपुणे महानगर क्षेत्रासाठी रद्द केली आहे.अधिक काटेकोरपणे लॉकडाऊन पाळले जावे,असे प्रशासनाला आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

    20 एप्रिलपासून लॉकडाऊनच्या बाबतीत काही प्रमाणात शिथिलता आणण्याचे राज्य सरकारने ठरविल्यानंतर नागरिकांनी मुक्तपणे व्यवहार सुरु केले होते. यावर मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना उद्देशून केलेल्या लाईव्ह प्रसारणातही नाराजी व्यक्त केली होती.तसेच निर्बंध न पाळल्यास शिथिलता रद्द केली जाईल असा इशाराही दिला होता.

    लॉकडाऊन संदर्भात राज्य शासनाने 17एप्रिल रोजी काढलेल्यासर्वसमावेशक अधिसूचनेतील नव्याने शिथिल केलेल्या बाबी रद्द करणारी दुरुस्ती आज करण्यात आली असून मुंबई महानगरआणि पुणे महानगर क्षेत्रासाठी ती लागू असेल.म्हणजेच 17 एप्रिलला सुधारित अधिसूचनेपूर्वीची परिस्थिती मुंबई महानगर आणि पुणे महानगरसाठी लागू राहील. उर्वरित राज्यात 17एप्रिलप्रमाणे शिथिलता राहील.

    उद्धव ठाकरे

    फोटो स्रोत, Shiv Sena

    • ई-कॉमर्स कंपन्यांनाइलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची वाहतूक करण्यास दिलेली शिथिलताही रद्द करण्यात आली आहे. त्यांना केवळ अन्न, जीवनावश्यक वस्तू, औषधीआणि वैद्यकीय उपकरणे यांचीच वाहतूक करता येईल.
    • फरसाण, मिठाईची दुकाने, कन्फेक्शनरी दुकाने हेही मुंबई-पुण्यात पूर्वीच्या आदेशाप्रमाणे बंदच राहतील
    • बांधकामे देखील मुंबई आणि पुण्यात बंदच राहतील तसेच या भागांतील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनी देखील त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून वर्क फ्रॉम होम पद्धतीनेच काम करून घ्यायचे आहे
    • राज्यभरातवृत्तपत्रांचे वितरण करणारे विक्रेते हे मास्क, जंतू नाशक हाताला लावून तसेच सामाजिक अंतर ठेऊन वृत्तपत्रे घरोघर देऊ शकतील मात्र मुंबई आणि पुणे पालिका क्षेत्रात तसेच कंटेनमेंट क्षेत्रात वितरण करण्यावर प्रतिबंध राहील असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
  8. कोविड संदर्भात महाराष्ट्रात आतापर्यंत 60 हजार गुन्हे दाखल

    महाराष्ट्रात सर्वत्र सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात 22 मार्च ते 20 एप्रिल या कालावधीत राज्यात कलम 188 नुसार 60,005 गुन्हे दाखल झाले आहेत.

    13,381 व्यक्तींना अटक करण्यात आली असून, 41,768 वाहने जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलीस विभागाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकामार्फत देण्यात आली आहे.

  9. दिल्लीतल्या पत्रकारांची चाचणी होणार

    दिल्लीतल्या पत्रकारांची कोरोना व्हायरसची चाचणी होणार आहे.

    चाचणीसाठी विविध ठिकाणी केंद्र उभारल्याची माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पीटीआयला दिली.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  10. भारतातील रुग्णांची संख्या 18601 वर पोहोचली

    भारतात काल 35 हजार चाचण्या झाल्या, तर आतापर्यंत एकूण 4 लाख 49 हजार 810 चाचण्या झाल्या. आयसीएमआरचे प्रमुख डॉ. गंगाखेडकर यांनी ही माहिती दिली.

    आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितलं, गेल्या 24 तासात 705 लोक कोरोनामुक्त झाले. बरे झालेल्यांची एकूण संख्या 3252 इतकी झालीय.

    काल दिवसभरात 1336 नवे रुग्ण सापडले असून, देशातील रुग्णांची एकूण संख्या आता 18 हजार 601 वर पोहोचलीय.

    भारतात आतापर्यंत 590 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झालाय.

  11. रॅपिड टेस्टिंगना पुढच्या दोन दिवसांसाठी स्थगिती

    रॅपिड टेस्टिंग पुढच्या दोन दिवसांसाठी थांबवण्याचे आयसीएमआरचे सर्व राज्यांना आदेश देण्यात आले आहेत. किट्समध्ये काही चुका असल्यास तपास करून दोन दिवसांनी पुढील स्पष्ट आदेश देण्यात येतील.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  12. आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल :

    • आतापर्यंत 3352 लोक कोरोनामुक्त झालेत
    • काल 1336 आणखी रुग्ण आढले
    • देशातील 65 जिल्ह्यात गेल्या 14 दिवसांपासून एकही रुग्ण आढळला नाही
    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  13. गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी पत्रकार परिषदेत काय माहिती दिली?

    • केंद्राकडून 6 टीम स्थापन करून चार राज्यात पाठवण्यात आल्यात. केंद्र सरकारचे अतिरिक्त सचिव या टीमचे नेतृत्त्व करत आहेत.
    • ग्रामीण भागातील लोक सतर्क असून, मास्कचाही चांगला वापर होतोय.
    • लोकहितासाठी लॉकडाऊन यशस्वी व्हावं म्हणून सर्वांनी सहकार्य करावं.
  14. इदी फाऊंडेशनचे प्रमुख फैजल इदी यांना कोरोनाची लागण

    पाकिस्तानातील इदी फाऊंडेशनचे प्रमुख आणि सामाजिक कार्यकर्ते फैजल इदी यांना कोरोना व्हायरसची लागण झालीय. फैजल इदी हे इस्लामाबादमध्ये अलगीकरण कक्षात आहेत.

    जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, काही दिवसांपूर्वीच फैजल इदी हे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना भेटले होते.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  15. व्हीडिओ कॅप्शन, चीनने कोरोना व्हायरस मृतांची आकडेवारी लपवली का? – सोपी गोष्ट
  16. '3 तारखेला लॉकडाऊन संपला नाही तर आम्ही घरी कसं जायचं?'

  17. राज्यात आज 472 रुग्णांची भर

    राज्यात मंगळवारी सकाळी 10 वाजेपर्यंत 472 नव्या रुग्णांची भर पडली. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 4,676 एवढी झाली आहे.

    राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे 232 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य खात्याने यासंदर्भात माहिती दिली.

  18. कोरोनामुळे भारतात स्वच्छ वायूसाठी चळवळ उभी राहणार?

    दिल्लीत आकाश आता बऱ्यापैकी चांगलं दिसू लागलंय.

    फोटो स्रोत, Getty Images

    फोटो कॅप्शन, दिल्लीत आकाश आता बऱ्यापैकी चांगलं दिसू लागलंय.

    कोरोनाने जगभर थैमान घातलंय. अनेक देशांमध्ये लाॅकडाऊन लागू करण्यात आला आहे. माणसांचं जाणंयेणं, गाड्यांची वाहतूक, कारखाने बंद असल्याने प्रदूषणात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे.

    निरभ्र आकाश, पक्ष्यांची किलबिल हे आपल्यापैकी अनेकजण अनुभवत आहोत. नद्या स्वच्छ होऊ लागल्या आहेत. कोरोनामुळे आपलं दैनंदिन आयुष्य विस्कळीत झालं असतं तरी प्रदूषणविरहित जगाचं महत्त्व आपल्याला उमगू लागलं आहे. यानिमित्ताने कोरोनाचं संकट कमी झाल्यावर अशा प्रदूषणविरहीत वातावरणासाठी चळवळ उभी राहणार का?

    वाचा, सौतिक बिश्वास यांचं हे विश्लेषण

  19. कोरोना कर्ज काय आहे? आर्थिक चणचण असेल तर ते काढावं की नाही?

  20. दिल्लीत काल सापडले 78 नवे रुग्ण, आजवरची एकूण रुग्णांची संख्या 2081 वर.

    दिल्लीत काल एका दिवसात 1397 सँपल तपासण्यात आले असून त्याद्वारे 78 नवे रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत, असं दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी सांगितलं.

    सध्याच्या घडीला दिल्लीत 26 रुग्ण ICUमध्ये आहेत तर 5 व्हेंटिलेटरवर, असंही ते म्हणाले. आजवरची एकूण रुग्णांची संख्या 2081 वर.