'हायड्रोक्सिक्लोरोक्विन’च्या
वापराचा मुद्दा येणाऱ्या काळात मुंबई महापालिका आणि राज्य सरकारमधील वादाचा मुद्दा
बनण्याची दाट शक्यता आहे.हायड्रोक्सिक्लोरोक्विन’ कोरोनाग्रस्त
भागात सामान्यांना द्यायचं का नाही, यावरून
मुंबई महापालिका आणि राज्य सरकारने परस्परविरोधी भूमिका घेतलीये.
मुंबईतील वाढती कोरोनाग्रस्तींची संख्या लक्षात घेता, प्रतिबंधात्मक
उपाययोजना म्हणून सरकारनेधारावी, वरळी
कोळीवाडा आणि जिजामातानगर या भागात HCQs औषध
देण्याचा निर्णय घेतला. मात्र, मुंबई
महापालिकेने या औषधाच्या साईट इफेक्टचं कारण पुढे करत सामान्यांना हे औषध सरसकट न
देण्याचा पवित्रा घेतलाय.
याबाबत बोलताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “'हायड्रोक्सि-क्लोरोक्विन’ औषध
सरसकट सामान्यांना न देण्याचा मुंबई महापालिकेने निर्णय घेतला आहे. या औषधाचे साईड
इफेक्ट नाकारता येत नाहीत. हृदयरोग, उच्चरक्तदाब, मधुमेह
यांसारख्या आजाराने ग्रस्त लोकांवर याचे साईड इफेक्ट होऊ शकतात.
सामान्य मुंबईकरांना या औषधामुळे काही साईड इफेक्ट झाले तर? यासाठी
या औषधाचा वापर धारावी, वरळी यासारख्या भागात न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची
माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलीये.
मुंबई महापालिकेने घेतलेल्या भूमिकेबाबत बोलतानामुख्य
सचिवांचे सल्लागार आणि राज्य सरकारने स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीचे सदस्यडॉ.
सुभाष साळुंखे म्हणाले, “मुंबई महापालिकेने विचारकरून सावध निर्णय
घेतला असावा. आता, कोव्हिड-19
बाबत पुढील रणनीती मुंबई महापालिकेला ठरवायची आहे. टेक्निकल एक्सपर्ट म्हणून
त्यांनी माझा सल्ला मागितला, तर
मी नक्की देईन.”
कोणत्या भागात दिलं जाणार होतंहायड्रोक्सिक्लोरोक्विन?
आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावी, वरळी-कोळीवाडा
आणि जिजामातानगर या भागात हे औषध दिलं जाणार होतं.
धारावीत
कोरोनाग्रस्तांची संख्या 101 वर पोहोचलीये. तर,
10 लोकांचा मृत्यू झालाय. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या
डॉक्टरांच्या सर्व्हेक्षणातून 25 लक्षणं
नसलेले कोव्हिड-19 रुग्ण आढळून आलेत.
तर, वरळी कोळीवाडा, जिजामातानगर
आणि प्रभादेवीच्या परिसरात 380 कोरोनाग्रस्त
रुग्ण आहेत.
काय म्हणाले होते आरोग्यमंत्री
राजेश टोपे ?
“तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीने केलेल्या शिफारसीनुसार मुंबईत
प्रतिबंधात्मक योजना आणि कोरोनाची व्याप्ती रोखण्यासाठी धारावी, वरळी-कोळीवाडा
आणि जिजामाता नगर परिसरात दोन लाख लोकांना 'हायड्रोक्सिक्लोरोक्वीन’ औषध
देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे औषध 15 वर्षाखालील
मुलं, हृदय आणि यकृतासंबंधी आजार असलेल्यांना दिलं जाणार नाही.”
“या औषधामुळे रुग्ण संख्येत घट होईल. आजाराचा संसर्ग आणि
संभाव्य गुंतागुंत कमी होईल. रुग्णांचा मृत्यूदर कमी होण्यास मदत होईल. राज्य आणि
केंद्राच्या संयुक्त समितीने हा निर्णय घेतला आहे,” असंही
ते पुढे म्हणाले.
धारावी, वरळी
आणि जिजामातानगर हा परिसर अत्यंत दाट वस्तीचा आहे. एकाच घरात छोट्या खोलीत 8-10
लोक एकत्र राहतात. याठिकाणी सोशल डिस्टंसिंग किंवा फिजीकल डिस्टंसिंग शक्य नाही.
स्वच्छतागृह घराबाहेर असल्याने लोकांना घरातून बाहेर पडण्यास मज्जाव करता येत
नाही.
सार्वजनिक
स्वच्छतागृह असल्याने संसर्ग होण्याचा धोका जास्त वाढण्याची शक्यात आहे. त्यामुळे
प्रतिबंधात्मक उपाय आणि संसर्ग रोखण्यासाठी२ लाख लोकांना हे औषध देण्याचा निर्णय
घेण्यात आला होता.
महापौर किशोरी पेडणेकर म्हणतात, जागतिक
आरोग्य संघटनेनेहायड्रोक्सिक्लोरोक्वीन’ औषधाला
मान्यता दिलीये. मात्र, याचे साईड इफेक्ट होणार नाहीत याचा काही पुरावा नाही.
त्यामुळे सद्यस्थितीत हे औषधकोव्हिड-19 रुग्णांची काळजी घेणाऱ्याडॉक्टर, नर्स
आणि कर्मचाऱ्यांनाचदिलं जाईल.
हायड्रोक्सिक्लोरोक्वीन’च्या
वापराने रुग्णांच्या शरीरातील कोव्हिड-19
व्हायरस कमी होण्यास मदत होते का नाही यावर काहीच पुरावा नाही. अनेक देशांमध्ये या
औषधाच्या वापराबाबत रुग्णांवर संशोधन सुरू आहे