You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

LIVE: भाजपच्या हातून झारखंड निसटलं, मुख्यमंत्रीही पराभूत

एकूण 81 जागांच्या झारखंड विधानसभेत बहुमतासाठी 41 जागा आवश्यक आहेत. झारखंड विधानसभा निवडणूक निकालांचे सर्वांत ताजे अपडेट्स इथे.

लाईव्ह कव्हरेज

  1. झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास यांचा राजीनामा

    झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास यांनी राजीनामा दिला आहे. राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना नवीन सरकार स्थापन होईपर्यंत त्यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करत राहण्यास सांगितलं आहे.

  2. झारखंडमध्ये आमच्या आघाडीनं निर्णायक विजय मिळवलाय – राहुल गांधी

    झारखंडमध्ये आमच्या आघाडीनं निर्णायक विजय मिळवला आहे. काँग्रेस पक्ष आणि आमच्या सहकारी पक्षांचे मी अभिनंदन करतो – राहुल गांधी

  3. जेव्हा हेमंत सोरेन वडील शिबू सोरेन यांना भेटले...

    हेमंत सोरेन आज दुपारी वडील शिबू सोरेन यांची भेट घेतली, तो क्षण...

    पत्रकार मारया शकील यांनी हा फोटो ट्वीट केला आहे.

  4. भाजपचा दारुण पराभव झाला आहे - हेमंत सोरेन

    महाआघाडीला 47 जागा मिळाल्या आहेत. ज्या उद्देशानं आघाडी बनवली होती, त्यामुळे भाजपचा दारुण पराभव झाला आहे. - हेमंत सोरेन

    झामुमोचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन यांनी डुमका मतदारसंघात भाजपच्या लॉईस मरांडी यांचा 13,188 मतांनी पराभव केला.

  5. निवडणुकीतील विजयासाठी हेमंत सोरेन यांचं अभिनंदन - नरेंद्र मोदी

    "आम्हाला अनेक वर्षं सेवेची संधी दिल्याबद्दल मी झारखंडच्या जनतेचे आभार मानतो. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कठोर मेहनत घेतली, त्यांचेही आभार मानतो. आम्ही यापुढेही राज्याची सेवा करत राहू आणि वेळोवेळी लोकांचे प्रश्न उठवत राहू," असं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं.

    "निवडणुकीतील विजयासाठी हेमंत सोरेन आणि झारखंड मुक्ती मोर्चाच्या आघाडीचं अभिनंदन. पुढच्या प्रवासासाठी त्यांना शुभेच्छा," असंही ते पुढे म्हणाले.

  6. झारखंडचा निकाल हा मैलाचा दगड - हेमंत सोरेन

    झारखंडचा निकाल हा मैलाचा दगड आहे. लोकांनी दिलेल्या कौलाबद्दल त्यांचे आभार मानतो, असं झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन म्हणाले.

  7. झारखंडच्या जनतेचा कौल स्वीकारतो - अमित शाह

    झारखंडच्या जनतेनं दिलेला कौल आम्ही स्वीकारतो, असं भाजप अध्यक्ष अमित शाह म्हणाले.

    "आम्हाला 5 वर्षं काम करण्याची संधी दिल्याबद्दल इथल्या जनतेचे आभार मानतो. राज्यातील विकास कायम राहावा, यासाठी भाजप बांधील आहे," असंही ते म्हणाले.

  8. रघुवर दास-भाजप सरकार का पराभवाच्या उंबरठ्यावर?, झारखंड विधानसभा निवडणुकीत भाजप आणि मुख्यमंत्री रघुवर दास यांना बहुमताचा आकडा गाठणं शक्य झालेलं नाही.

    झारखंड निवडणुकांचे निकाल हळुहळू स्पष्ट होत आहेत, ज्यानुसार भाजपची सत्ता जाण्याची चिन्हं आहेत. झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल यांची आघाडी पुढे असल्याचं दिसून येत आहे. भाजपच्या झारखंडमधल्या या अवस्थेची कारणं जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीने 'द हिंदू'च्या नॅशनल ब्युरोच्या राजकीय संपादक निस्तुला हेब्बार, बीबीसी भारतीय भाषांचे डिजिटल संपादक मिलिंद खांडेकर आणि बीबीसी हिंदीचे डिजिटल संपादक राजेश प्रियदर्शी यांच्याशी चर्चा केली.

  9. भाजपचा पराभव असेल तर तो माझा पराभव', मावळते मुख्यमंत्री रघुवर दास

    मावळते मुख्यमंत्री रघुवर दास यांची पत्रकार परिषद सुरू आहे. ते म्हणाले, "जोवर संपूर्ण निकाल येत नाही, तोवर याविषयी बोलता येणार नाही. संपूर्ण निकाल लागल्यानंतर मी सविस्तर बोलेल. भाजपचा पराभव होत असेल, तर तो माझा पराभव असेल."

  10. देशात धार्मिक अंतर वाढवण्याचा प्रयत्न - पवार

    झारखंडच्या निकालांबरोबरच शरद पवारांनी सरकारच्या CAA-NRC गोंधळावरही वक्तव्य केलं. ते म्हणाले -

    या सरकारला सर्वंच आघाडींवर अपयश आलं आहे, आणि त्यापासून लोकांचा लक्ष हटवण्यासाठी ते NRC-CAAसारख्या मुद्द्यांचा आधार घेत आहेत. केंद्र सरकारने देशाचं अर्थकारण व्यवस्थित हाताळलं नाही, देशातलं गुंतवणुकीचं वातावरण बिघडलं आहे.त्याचा सामान्य माणसाला सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे साहजिकच एक प्रकारची नापसंती भाजपसाठी लोकांच्या मनात आहे.

    तसंच नागरिकत्व दुरुस्ती कायद्यासारखे प्रश्न उपस्थित करून एकप्रकारे देशात धार्मिक अंतर वाढवण्याचा प्रयत्न देशात केला जात आहे.

    पंतप्रधान मोदी आपल्या दिल्लीच्या एका भाषणात म्हणाले की हा विषय त्यांनी संसदेत किंवा मंत्रिमंडळात चर्चिला गेला नाही. मी तसंच प्रफुल्ल पटेल या चर्चांच्या वेळी उपस्थित होतो. पटेलांनी तर या चर्चेत भागही घेतला होता.

    एवढंच नव्हे तर राष्ट्रपतींच्या 2019च्या अभिभाषणातही NRC देशभरात आणण्याची या सरकारने भूमिका घेतली आहे, असं सांगण्यात आलं होतं. राष्ट्रपतींचं भाषण हे तर सरकारचं अधिकृत धोरण असतं. मग अशा वेळी संसदेत यावर चर्चा झालीच नाही, हे पंतप्रधानांनी म्हणणं साफ चुकीचं ठरेल.

    झारखंडच्या आमच्या साथीदारांनी सांगितलं की या सरकारच्या बाबतीत लोकांच्या मनात विश्वास राहिला नाही, आणि NRC सारख्या मुद्द्यांमुळे ते आणखी दुरावले गेले.

  11. भाजप लोकांचा कौल स्वीकारेल - रघुवर दास

    निकाल आमच्या बाजूनं लागतील, अशी मला आशा आहे. पूर्ण निकालाची मी वाट पाहतोय. मात्र, भाजप लोकांचा कौल स्वीकारेल - रघुवर दास, झारखंडचे मुख्यमंत्री

  12. शरद पवार यांची पत्रकार परिषद

    राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची पत्रकार परिषद सुरू आहे. त्यातील काही ठळक मुद्दे -

    • झारखंडच्या निकालांमधून एक गोष्ट स्पष्ट आहे की झामुमो-काँग्रेस-राजद आघाडी बहुमताच्या दिशेने चालले आहेत, म्हणजे पुन्हा एकदा एक भाजपएतर आघाडी सत्तेत येते आहे. यापूर्वी छत्तीसगड, राजस्थान, मध्यप्रदेशमध्येही भाजप सरकार होतं आणि ते गेलं.
    • झारखंडची स्थिती ही जरा वेगळी आहे. एक तर तो आदिवासीबहुल भाग आहे, तिथे गरिबी जास्त आहे आणि सामान्य लोकांच्या अनेक समस्या आहेत. तेव्हा पैशांच्या बळावर भाजपने सत्ता कायम राखण्याचा प्रयत्न केला, मात्र मला आनंद आहे की लोकांनी भाजपला धडा शिकवला. आणि देश जो एका नव्या वाटेवर चालला आहे, त्यात झारखंडनेही हातभार लावला आहे.
    • पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्या वक्तव्यांमधून देशाच्या अनेक राज्यांमध्ये अस्वस्थता वाढते आहे. CAA-NRC वरून असाच कारभार पुढेही सुरू राहिला तर लोक आपला निर्णय झारखंडच्या पद्धतीने घेतील.
    • राष्ट्रवादी काँग्रेसने पाच जागा लढवल्या होत्या, त्यापैकी एक जिंकली आहे.
    • झारखंडच्या आमच्या साथीदारांनी सांगितलं की या सरकारच्या बाबतीत लोकांच्या मनात विश्वास राहिला नाही, आणि NRC सारख्या मुद्द्यांमुळे ते आणखी दुरावले गेले.
  13. भाजप 31, तर काँग्रेस-जेएमएम 40 जागी आघाडीवर - निवडणूक आयोग

    निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, भाजप आतापर्यंत 31 जागांवर तर काँग्रेस-जेएमएम-राजद युती 40 जागांवर आघाडीवर

  14. भाजपचे बंडखोर सरयू राय यांची आघाडी, मुख्यमंत्री रघुवर दास पिछाडीवर

  15. रघुवर दास यांनी 13 आमदारांची तिकिटं कापल्यामुळे नुकसान- निस्तुला हेब्बार

    वरिष्ठ राजकीय पत्रकार निस्तुला हेब्बार यांनी बीबीसी प्रतिनिधी पंकज प्रियदर्शी यांच्याशी बोलताना सांगितले, झारखंडमध्ये भाजपाच्या स्थानिक नेतृत्वाची कामगिरी फारशी चांगली राहिली नाही, रघुवर दास यांनी स्वतःच्या मार्गातच काही अडथळे तयार केले. त्यांनी 13 आमदारांची तिकिटं कापली, या सगळ्याचा एकत्रित तोटा भाजपाला झाला.

  16. हेमेंत सोरेन दोन्ही जागांवर आघाडीवर

  17. काँग्रेस आघाडीचच सरकार झारखंडमध्ये सत्तेवर येईल

    काँग्रेसचे झारखंड प्रभारी आरपीएन सिंग यांनी आपली आघाडी झारखंडमध्ये सत्ता स्थापन करेल असं सांगितलं तसेच हेमंत सोरेन आपल्या आघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

  18. हेमंत सोरेन यांची एका जागेवर आघाडी

  19. हेमंत सोरेन मुख्यमंत्री होतील- तेजस्वी यादव

    राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी हेमंत सोरेन झारखंडचे मुख्यमंत्री होतील असं सांगितलं आहे.

  20. माजी मुख्यमंत्री बाबुलाल मरांडी धनवर मतदारसंघातून 2841 मतांनी आघाडीवर आहेत.