You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

निकाल: युतीला बहुमत, मात्र 50:50 फॉर्मुल्यावरून रस्सीखेच

महाराष्ट्राचा निकाल युतीच्या बाजूने लागला असला तरी शिवसेना आणि भाजप यांच्यामधील '50:50' भागीदारीवरील रस्सीखेच पुन्हा सुरू झाली आहे.

लाईव्ह कव्हरेज

  1. कराड दक्षिण : पृथ्वीराज चव्हाण जिंकले, अतुल भोसले पराभूत

  2. सोलापुरात प्रणिती शिंदेंची विजयी हॅट्रीक, एमआयएम पराभूत

  3. कणकवली: नितेश राणे विजयी, शिवसेनेचे सतीश सावंत पराभूत

  4. कोथरूडमधून चंद्रकांत पाटील विजयी, मनसेचे किशोर शिंदे पराभूत

  5. देवेंद्र फडणवीस विजयी, काँग्रेसचे आशिष देशमुख पराभूत

  6. औरंगाबादमध्ये एमआयएमला धक्का, महायुतीचे उमेदवार जिंकले

  7. भाजपचे शिवेंद्रराजे भोसले साताऱ्यातून विजयी, राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक पवार पराभूत

  8. साकोलीमधून काँग्रेसच्या नाना पटोले यांचा विजय, परिणय फुके पराभूत

  9. रोहित पवार कर्जत-जामखेडमधून विजयी, राम शिंदेंचा पराभव

  10. आदित्य ठाकरे वरळीतून विजयी

  11. लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसलेंचा पराभव कशामुळे?

  12. हे निकाल म्हणजे 'मोदी मॉडेल'वर लागलेला अंकुश - विश्लेषण

  13. हरलो पण संपलो नाही - उदयनराजे भोसले

  14. देवेंद्र फडणवीस सरकारमधले हे आठ मंत्री हरले

  15. मुंबईतल्या सर्व 36 जागांचा निकाल एकाच ठिकाणी

  16. नालासोपाऱ्यात प्रदीप शर्मा हे क्षितिज ठाकूर यांच्याकडून पराभूत

  17. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस मतदारसंघातून ऊसतोड कामगाराचा मुलगा आमदार झाला आहे.

    भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राम सातपुते हे माळशिरस मतदारसंघातून 2 हजार 702 मतांनी विजयी झाले. राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम जानकर यांना त्यांनी पराभूत केलं आहे.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जाणारे राम सातपुते भांबुर्डी गावातील असून अतिशय गरीब परिस्थितीतून ते पुढे आले. राम सातपुते यांचे आई वडील ऊसतोडणी कामगार आहेत.

  18. फडणवीसांचे पीए अभिमन्यू पवार औशात विजयी

  19. कोण जिंकलं? कोण हरलं? पाहा महाराष्ट्रातील सर्व विजयी उमेदवारांची यादी

  20. अमित शहांनी केलं अभिनंदन

    महाराष्ट्र आणि हरियाणा राज्यांमधल्या विधानसभेच्या निवडणुकांमधल्या विजयानंतर भाजप पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी दिल्लीच्या भाजप कार्यालयातून कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

    ते म्हणाले की, "महाराष्ट्र आणि हरियाणात आम्ही कधी मुख्यमंत्री बनवू शकलो नव्हतो. पण पूर्ण बहुमतानं आम्ही केंद्र सरकार बनवलं. दोनही राज्यातही आमचं सरकार आलं. दोन्ही राज्यात भ्रष्टाचारमुक्त सरकार सलग 5 वर्ष चाललं. मनोहरलाल खट्टर आणि देवेंद्र फडणवीस यांनी सक्षमपणे सरकार सांभाळलं."