ॲपल डेली हे हाँगकाँगमधील एकमेव सरकारविरोधी वृत्तपत्रही बंद पडलं
हाँगकाँगमधलं एकमेव लोकशाहीवादी आणि चीनविरोधी वर्तमानपत्र ॲपल डेली अखेर बंद झालं आहे. गेल्यावर्षी तिथं राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू झाल्यानंतर या कायद्याअंतर्गत अनेकांची धरपकड झाली.
यात पहिली अटक या वृत्तपत्राचे मालक आणि संस्थापक जिमी लाय यांना झाली होती. नंतर कार्यालयावर पोलिसांच्या धाडीही नेहमीच्या झाल्या होत्या. या सगळ्याला कंटाळून अखेर हे वृत्तपत्र बंद करण्याचा निर्णया मालकांना घ्यावा लागला.
पण, हाँगकाँगच्या लोकशाहीसाठीच्या लढ्यात ही एक महत्त्वाची घटना असणार आहे. ॲपल डेलीचं आतापर्यंतचं काम आणि बंद होण्याची आलेली वेळ याविषयी अधिक जाणून घेऊया...
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)