कोण आहे हा गोंडस चिमुरडा?

भूतानचे राजे आपल्या कुटुंबीयांसमवेत भारताच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांच्या या लहानग्याने भारतीयांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

यंग भूतान

फोटो स्रोत, YELLOW

फोटो कॅप्शन, भूतानची ओळख असलेला पिवळा अंगरखा ल्यालेला हा गोड चिमुरडा आहे भूतानचा युवराज.
यंग भूतान
फोटो कॅप्शन, या गोडुल्याच्या जन्माचा आनंद म्हणून भूतानमध्ये लाखो झाडे लावण्यात आली.
यंग भूतान

फोटो स्रोत, YELLOW

फोटो कॅप्शन, भूतान राजघराण्याच्या माध्यम विभागानं या गोंडस छोकऱ्यासाठी स्वतंत्र कॅलेंडरच काढलं. कोणालाही आवडेल अशा या पिटुकल्याचे फोटो मोफत डाऊनलोड करता येण्याची व्यवस्था पुरवण्यात आली होती.
यंग भूतान

फोटो स्रोत, FACEBOOK/ JETSUN PEMA

फोटो कॅप्शन, प्रत्येक लहान मुलगा आवडण्यासारखा असतो. मात्र या गोजिऱ्यानं मन खिळवून ठेवलं आहे, असं एका फॅनने फेसबुकवर म्हटलं आहे.
यंग भूतान

फोटो स्रोत, FACEBOOK / JETSUN PEMA

फोटो कॅप्शन, जिग्मे खेसर नमग्येल वांगचूक हे भूतानचे राजे आहेत. जगातल्या तरुण राष्ट्रप्रमुखांमध्ये त्यांचा समावेश होतो. हा फोटो लिंगकाना पॅलेस अर्थात राजांच्या घरी काढलेला आहे.
यंग भूतान

फोटो स्रोत, FACEBOOK/ JETSUN PEMA

फोटो कॅप्शन, सोशल मीडियाच्या माध्यमातून राजघराण्याने आपली प्रतिमा बदलली आहे. 1999 साली भूतानमध्ये इंटरनेटचं आगमन झालं. राणी जेटसून पेमा फेसबुकवर आपल्या कुटुंबीयांचे फोटो नियमितपणे शेअर करतात.
यंग भूतान

फोटो स्रोत, FACEBOOK/KING JIGME KHESAR NAMGYEL WANGCHUK

फोटो कॅप्शन, भूतानच्या जनतेला राजे आणि कुटुंबीयांबद्दल अतीव प्रेम असून, त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला नागरिक उत्सुक असतात.
राजकुमार

फोटो स्रोत, TWITTER

फोटो कॅप्शन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अभिवादन करताना
सुषमा स्वराज

फोटो स्रोत, Twitter

फोटो कॅप्शन, सुषमा स्वराज यांच्यासोबत राजकुमाराच्या या फोटोची सोशल मिडियावर चर्चा होती.