टोकियो मोटर शोमध्ये एकाहून एक भन्नाट काँसेप्ट कारची रेलचेल

25 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर चालणाऱ्या टोकियो मोटर शोमध्ये जगभरातील मोठ्या ऑटोमोबाईल कंपन्यांनी त्यांच्या नवीन अकल्पनीय कार सादर केल्या आहेत.

टोयोटाची कंसेप्ट-आई कार

फोटो स्रोत, TOMOHIRO OHSUMI/GETTY IMAGES

फोटो कॅप्शन, जपानमध्ये 45व्या टोकियो मोटर शोमध्ये अफलातून काँसेप्ट कार सादर करण्यात आल्या आहेत. ही टोयोटाची कंसेप्ट-आई कार आहे.
सुझुकी ई-सवायवर

फोटो स्रोत, TOMOHIRO OHSUMI/GETTY IMAGES

फोटो कॅप्शन, ही आहे सुझुकीची ई-सवायवर. 5 नोव्हेंबर पर्यंत चालणाऱ्या टोकियो मोटर शोमध्ये जगभरातील तमाम मोठ्या ऑटोमोबाईल कंपन्या त्यांच्या नवीन कार सादर करतात.
टोयोडा गोसईची 'फ्लेश्बी' कार

फोटो स्रोत, REUTERS/KIM KYUNG-HOON

फोटो कॅप्शन, जपानच्या ऑटो पार्ट कंपनी टोयोडा गोसईची ही 'फ्लेश्बी' कार. यात फक्त एकच माणूस बसू शकतो. कंपनीचा दावा आहे की हायस्पीड ड्रायव्हींग करताना ही कार वेगाप्रमाणे कारचा आकार बदलू शकते. भारी ना?
यामाहाची हाय-टेक 'मोटरआयडी' बाईक सुद्धा टोकियो मोटर शोचं खास आकर्षण आहे.

फोटो स्रोत, REUTERS/TORU HANAI

फोटो कॅप्शन, यामाहाची हाय-टेक 'मोटरआयडी' बाईक सुद्धा टोकियो मोटर शोचं खास आकर्षण आहे.
यामाहा एमडब्लूसी-4.

फोटो स्रोत, REUTERS/TORU HANAI

फोटो कॅप्शन, बाईक आहे की कार? यामाहाची ही गाडी दिसायला बाईक आहे, पण तिला चार चाकं आहेत. तिचं नाव यामाहा एमडब्लूसी-4.
टोयोटोची कंसेप्ट कार वंडर-कॅप्सूल.

फोटो स्रोत, REUTERS/KIM KYUNG-HOON

फोटो कॅप्शन, ही आहे वंडर-कॅप्सूल. टोयोटो मोटर कॉर्पोरेशनची एक अकल्पनीय काँसेप्ट कार. जपानने इलेक्ट्रिक कार क्षेत्रात बरीच प्रगती केली आहे. पण अशा पांढऱ्या शुभ्र काँसेप्ट कारमध्ये प्रत्यक्ष निर्मितीत येईस्तोवर अनेक बदल होतात. अनेकदा त्यांचं अस्तित्व केवळ काँसेप्ट पुरतंच मर्यादित राहतं.