You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाहा व्हीडिओ : महिलांची लैंगिक छळवणूक म्हणजे नेमकं काय?
सार्वजनिक वाहतुकीदरम्यान महिलांचं सर्वाधिक लैंगिक शोषण होत असतं.
लैंगिक छळवणूक म्हणजे काय तर - शिट्ट्या मारणं, हॉर्न वाजवणं, पाठलाग, अश्लील शेरेबाजी, नकोसा स्पर्श आणि असा कुठलाही लैंगिक अत्याचार. असे अनेक प्रसंग दररोज अनेकींच्या आयुष्यात घडत असतात.
सर्वसाधारणपणे स्त्रिया याविषयी बोलत नाहीत. पण हे सर्व थांबवायचं असेल तर या विरोधात आवाज उठवावा लागेल.
दिल्लीत 10 पैकी 9 स्त्रियांनी मेट्रो किंवा बसमध्ये लैंगिक छळ झाल्याचं सांगितलं, असं एक सर्वेक्षण सांगतं.
यूके, अमेरिका या ठिकाणीही सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांतून प्रवास करताना स्त्रियांची छळवणूक होते. याविरोधातलं मौन तर सर्वाधिक धोकादायक आहे.
बीबीसीची 100Women काय आहे?
बीबीसी दरवर्षी जगातील 100 प्रभावशाली महिलांच्या प्रेरणादायी कथा लोकांसाठी घेऊन येते. 2017 मध्ये पारंपारिक चौकटीला भेदणाऱ्या स्त्रिया, महिला शिक्षण, सार्वजनिक जागांवर लैंगिक शोषण आणि खेळामधील लैंगिक भेदभाव हे चार विषय निवडले आहेत.
आपल्या सर्वांच्या सहकार्यानं या महिला जीवनातील उंच शिखरं चढत आहेत. आपणही या मोहिमेत सामील होऊ शकता. या कथा सोशल मीडियावर बघताना किंवा टाकताना #100Women हा हॅशटॅग नक्की वापरा.
आणखी बघा-
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)