निधनाच्या एका वर्षानंतर थायलंडच्या राजावर अंत्यसंस्कार

थायलंडचे लोकप्रिय राजे भूमीबोल अद्युल्लदेज 2016 मध्ये यांच्या अंत्यसंस्काराची प्रकिया सध्या बँकॉकमध्ये सुरू आहे. गेल्या वर्षभरापासून याची तयारी सुरू होती.

थायलंडचे लोकप्रिय राजे भूमीबोल अद्युल्लदेज यांच्या शाही इतमामातल्या अंत्यसंस्काराची प्रक्रिया सध्या बँकॉकमध्ये सुरू आहे. 5 डिसेंबर 1927ला अमेरिकेतल्या केंब्रिज इथं जन्मलेल्या भूमीबोल अद्युल्लदेज यांचं ऑक्टोबर 2016मध्ये निधन झालं होते. तेव्हापासूनच त्यांच्या शाही अंत्यसंस्काराची तयारी सुरु करण्यात आली होती. गेल्या वर्षभरात जवळपास अडीच लाख लोकांनी यात भाग घेतला. बीबीसीचे डॅनियल बुल आणि थन्यराट डोकसन यांनी या शाही अंतिम संस्काराचा आढावा घेतला.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, थायलंडचे लोकप्रिय राजे भूमीबोल अद्युल्लदेज यांच्या शाही इतमामातल्या अंत्यसंस्काराची प्रक्रिया सध्या बँकॉकमध्ये सुरू आहे. 5 डिसेंबर 1927ला अमेरिकेतल्या केंब्रिज इथं जन्मलेल्या भूमीबोल अद्युल्लदेज यांचं ऑक्टोबर 2016मध्ये निधन झालं होते. तेव्हापासूनच त्यांच्या शाही अंत्यसंस्काराची तयारी सुरु करण्यात आली होती. गेल्या वर्षभरात जवळपास अडीच लाख लोकांनी यात भाग घेतला. बीबीसीचे डॅनियल बुल आणि थन्यराट डोकसन यांनी या शाही अंत्यसंस्कार सोहळ्याचा आढावा घेतला.
अदून्यदेत यांच्या अंत्ससंस्कारासाठी एक शाही चिता बनवण्यात आली आहे. तिच्या आसपासचा संपूर्ण परिसर स्वर्गाच्या प्रतिरुपात विकसित करण्यात आला आहे. सर्व लोक जमा झाल्यानंतर चिता ठेवण्यात आली. नंतर देवांची पूजा करण्यात आली. राजाने केलेली कामं दाखवण्यासाठी चितेच्या आसपास असलेल्या 4000 हजार प्रोजेक्टपैकी 3000 प्रोजेक्ट पाण्याशी संबंधित होते. राजाची पाण्याशी असलेली कटिबद्धता दाखवण्यासाठी हे करण्यात आलं होतं.

फोटो स्रोत, SAEED KHAN/AFP/GETTY IMAGES

फोटो कॅप्शन, अद्युल्लदेज यांच्या अंत्यसंस्कारासाठी एक शाही चिता बनवण्यात आली आहे. आसपासचा संपूर्ण परिसर स्वर्गाच्या प्रतिरुपात सजवण्यात आला आहे. सर्व लोक जमा झाल्यानंतर चिता ठेवण्यात आली. नंतर देवांची पूजा करण्यात आली. राजाने केलेली कामं दाखवण्यासाठी चितेच्या आसपास काही प्रोजेक्ट उभारली गेली होती. 4000 प्रोजेक्ट्सपैकी 3000 प्रोजेक्ट पाण्याशी संबंधित होती. राजाची पाणी प्रश्नाविषयी असलेली तळमळ दाखवण्यासाठी हे करण्यात आलं होतं.
जगात प्रदीर्घ काळ राज्यावर असणाऱ्या सत्ताधीशांपैकी अद्युल्लदेज हे एक होते. त्यांच्या राज्यात थायलंडमध्ये अनेक वेळा सैन्याने सत्तेवर वर्चस्व मिळवलं. ते संविधानिक पद्धतीनं राजे बनल्यामुळे त्यांना काही मर्यादा होत्या. तरीही थायलंडची जनता त्यांच्याकडं देव म्हणून पाहायची.

फोटो स्रोत, AFP/GETTY IMAGES

फोटो कॅप्शन, जगात प्रदीर्घ काळ राज्यावर असणाऱ्या सत्ताधीशांपैकी अद्युल्लदेज हे एक होते. त्यांच्या राज्यात थायलंडमध्ये अनेक वेळा सैन्याने सत्तेवर वर्चस्व मिळवलं. ते घटनात्मक पद्धतीनं राजे बनल्यामुळे त्यांना काही मर्यादा होत्या. तरीही थायलंडची जनता त्यांच्याकडे देव म्हणून पाहायची.
त्यानंतर अदून्यदेत आईसोबत स्वित्झर्लंडला गेले आणि तिथंच त्यांनी शिक्षण पूर्ण केले. तरुणपणाच्या काळात त्यांना फोटोग्राफी करण्याचा, सैक्सोफोन वाजवण्याचा आणि गाणी लिहिण्याची आवड होती. तसंच ते पेंटिंग आणि लेखनही करत असत. 1935 साली त्यांचे काका किंग प्रजादोपक यांनी राजपद सोडलं आणि त्यानंतर अदून्यदेत यांचे भाऊ आनंद यांनी गादी सांभाळायला सुरुवात केली. 1946 मध्ये नेमबाजी करताना झालेल्या दुर्घटनेत आनंद यांचा मृत्यू झाला. त्यांच्यानंतर अदून्यदेत यांच्याकडं राजपद सोपवण्यात आलं. त्यावेळी अदून्यदेत अवघ्या अठरा वर्षांचे होते.

फोटो स्रोत, PORNCHAI KITTIWONGSAKUL/AFP/GETTY IMAGES

फोटो कॅप्शन, लहानपणी अद्युल्लदेज आईबरोबर स्वित्झर्लंडला गेले आणि तिथेच त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. तरुणपणाच्या काळात त्यांना फोटोग्राफी करण्याचा, सेक्साफोन वाजवण्याचा आणि गाणी लिहिण्याची आवड होती. तसंच ते पेंटिंग करत आणि लेखनही करत असत. 1935 साली त्यांचे काका किंग प्रजादोपक यांनी राजपद सोडलं आणि त्यानंतर अद्युल्लदेज यांचे भाऊ आनंद यांनी गादी सांभाळायला सुरुवात केली. 1946 मध्ये नेमबाजी करताना झालेल्या दुर्घटनेत आनंद यांचा मृत्यू झाला. त्यांच्यानंतर अद्युल्लदेज यांच्याकडे राजपद सोपवण्यात आलं. त्यावेळी अद्युल्लदेज अवघ्या नऊ वर्षांचे होते.
स्वित्झर्लंडला शिकायला गेल्यामुळं अदून्यदेत यांच्या सुरुवातीच्या काळात काही वर्षं त्यांनी नेमलेल्या प्रतिनिधीनं थायलंडवर राज्य केलं. पॅरिसमध्ये त्यांची भेट भावी पत्नी सिरिकत यांच्याशी झाली. सिरिकत या फ्रान्समधील थायलंडच्या राजदूताची मुलगी होत्या.

फोटो स्रोत, EMMANUEL DUNAND/AFP/GETTY IMAGES)

फोटो कॅप्शन, स्वित्झर्लंडला शिकायला गेल्यामुळं अद्युल्लदेज यांच्या सुरुवातीच्या काळात काही वर्षं त्यांनी नेमलेल्या प्रतिनिधीनं थायलंडवर राज्य केलं. पॅरिसमध्ये त्यांची भेट फ्रान्समधील थायलंडच्या राजदूताच्या मुलीशी झाली. याच सिरिकत यांच्याशी अद्युल्लदेज यांनी नंतर विवाह केला.
28 एप्रिल 1950ला त्या दोघांचे लग्न झाले. त्यानंतर एका आठवड्यानं बँकॉकचे नवीन सम्राट म्हणून त्यांचं राज्यारोहन झालं. अदून्यदेत यांच्या शासनाच्या कार्यकाळातील सुरुवातीच्या सात वर्षात थायलंडमध्ये लष्कराचा सत्तेवर ताबा होता आणि अदून्यदेत फक्त नावाचेच राजे होते. 1957च्या सप्टेंबरमध्ये जनरल धनराजत यांनी सत्तेवर कब्जा केला होता.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 28 एप्रिल 1950ला त्या दोघांचं लग्न झालं. त्यानंतर एका आठवड्यानं बँकॉकचे नवीन सम्राट म्हणून त्यांचा राज्याभिषेक झाला. अद्युल्लदेज यांच्या कार्यकाळातील सुरुवातीच्या सात वर्षांत थायलंडमध्ये लष्कराचं वर्चस्व होतं आणि अद्युल्लदेज फक्त नामधारी राजे होते. 1957च्या सप्टेंबरमध्ये जनरल धनराजत यांनी सत्तेवर कब्जा केला होता.
एका आदेशानुसार अदून्यदेत यांनी सरितला सैनिक प्रमुख म्हणून घोषित केलं. याच दरम्यान अदून्यदेत यांनी राजशाहीच्या पुनरुज्जीवनाचं काम केलं. या काळात त्यांनी अनेक दौरे केले आणि अनेक विकासकार्य केले. 1973 साली सैनिकांनी जेव्हा लोकतंत्राचं समर्थन करण्यासाठी सुरु असलेल्या प्रदर्शनावर गोळीबार केला, तेव्हा अदून्यदेत यांनी नाटकीय पद्धतीनं त्यात हस्तक्षेप केला.

फोटो स्रोत, AFP/GETTY IMAGES

फोटो कॅप्शन, एका आदेशानुसार अद्युल्लदेज यांनी सरितला सैन्य प्रमुख म्हणून घोषित केलं. याच दरम्यान अदून्यदेत यांनी राजेशाहीच्या पुनरुज्जीवनाचं काम केलं. या काळात त्यांनी अनेक दौरे केले आणि अनेक विकासकार्य केली. 1973 साली सैनिकांनी जेव्हा लोकशाहीचं समर्थन करण्यासाठी सुरु असलेल्या निदर्शनांवर गोळीबार केला, तेव्हा अद्युल्लदेज यांनी नाटकी पद्धतीनं त्यात हस्तक्षेप केला.
आंदोलनकर्त्यांना राजभवनात शरण येण्यासाठी सांगण्यात आलं. यामुळं तत्कालीन पंतप्रधान थानम कित्तिकार्चन यांचं सरकार संपुष्टात आलं. त्यानंतर तीन वर्षांनी सुरक्षा गटातील लोकांनी डाव्या संघटनांतील विद्यार्थ्यांना मारलं आणि हा प्रकार रोखण्यात अदन्यदूत अपयशी ठरले. त्यावेळी नुकतेच वियतनाम युद्ध संपले होते आणि साम्यवादी विचारांशी सहानुभूती असणाऱ्यांची संख्या वाढत आहे, असं थायलंचडच्या राजेशाहीला वाटत होतं. सरकारला उलथवून टाकण्याचा सैन्यानं अनेक वेळा प्रयत्न केला होता. राजधानीवरही कब्जा करण्यात सैन्याला यश आलं होतं. पण, अदन्यदूत यांच्यावर विश्वास असलेल्या काही सैनिकांच्या मदतीनं राजधानीवर सरकारला परत कब्जा मिळवता आला.

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, आंदोलनकर्त्यांना राजभवनात शरण येण्यासाठी सांगण्यात आलं. यामुळे तत्कालीन पंतप्रधान थानम कित्तिकार्चन यांचं सरकार संपुष्टात आलं. त्यानंतर तीन वर्षांनी सुरक्षा गटातील लोकांनी डाव्या संघटनांतील विद्यार्थ्यांना मारलं आणि हा प्रकार रोखण्यात अद्युल्लदेज अपयशी ठरले. त्यावेळी नुकतंच व्हिएतनाम युद्ध संपलं होते आणि साम्यवादी विचारांशी सहानुभूती असणाऱ्यांची संख्या वाढत आहे, असं थायलंचडच्या राजेशाहीला वाटत होतं. सरकारला उलथवून टाकण्याचा लष्करानं अनेक वेळा प्रयत्न केला होता. राजधानीवरही कब्जा करण्यात लष्कराला यश आलं होतं. पण, अद्युल्लदेज यांच्यावर विश्वास असलेल्या काही लष्करी अधिकाऱ्यांच्या मदतीनं राजधानीवर परत कब्जा मिळवण्यात राजाला यश आलं.
1992 साली विद्रोही जनरल सुचिंद क्रपरायनू यांनी प्रधानमंत्री बनण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या विरोधात झालेल्या प्रदर्शनांवर गोळ्या चालवण्यात आल्या. यानंतर राजाने सुचिंद आणि लोकतंत्राचं समर्थन करणारे नेते चामलंग श्रीमुआंग यांना राजशाही परंपरेचं पालन करत गुडघ्यावर चालत राज दरबारात हजर राहण्याचं सागितलं. प्रधानमंत्री थाकसिन शिनावाट यांच्या कारकीर्दीत अनेक वेळा राजाला हस्तक्षेप करण्यासाठी सांगण्यात आलं, पण त्यांनी ते टाळलं. एप्रिलमध्ये झालेल्या निवडणुका थाकसिन जिंकले होते. पण, न्यायालयाने त्यांना रद्दबातल ठरवलं होतं.

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, 1992 साली बंडखोर जनरल सुचिंद क्रपरायनू यांनी पंतप्रधान बनण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या विरोधात झालेल्या आंदोलनात निदर्शकांवर गोळीबार झाला. यानंतर राजानं सुचिंद आणि लोकशाहीचं समर्थन करणारे नेते चामलंग श्रीमुआंग यांना राजेशाही परंपरेचं पालन करत गुडघ्यावर चालत राज दरबारात हजर राहण्याचं सागितलं. पंतप्रधान थाकसिन शिनावाट यांच्या कारकिर्दीत अनेक वेळा राजाला हस्तक्षेप करण्यासाठी सांगण्यात आलं, पण त्यांनी ते टाळलं. एप्रिलमध्ये झालेल्या निवडणुकांत थाकसिन जिंकले होते. पण, न्यायालयाने त्यांची निवड रद्दबातल ठरवली.
2008 साली राजाच्या 80 व्या जन्मदिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात संपूर्ण देश सहभागी झाला होता. 2014च्या मे महिन्यात जनरल प्रयुत चान-ओचा यांनी सत्तेवर कब्जा मिळवला. त्यानंतर काही महिन्यांनी चान-ओचा यांना प्रधानमंत्री बनवण्यात आलं. त्यांनी दूरगामी अशा राजकीय सुधारणांचं आश्वासन दिलं असलं, तरी टीकाकारांच्या मते, माजी प्रधानमंत्र्याच्या पक्षाला संपूर्णपणे बरबाद करणे, हीच चान-ओचा यांची प्राथमिकता होती.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 2008 साली राजाच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त झालेल्या कार्यक्रमात संपूर्ण देश सहभागी झाला होता. 2014च्या मे महिन्यात जनरल प्रयुत चान-ओचा यांनी सत्तेवर ताबा मिळवला. त्यानंतर काही महिन्यांनी चान-ओचा यांना पंतप्रधान केलं गेलं. त्यांनी सत्तेवर येताच दूरगामी अशा राजकीय सुधारणांचं आश्वासन दिलं असलं, तरी टीकाकारांच्या मते, माजी पंतप्रधानांच्या पक्षाला संपूर्णपणे नेस्तनाबूत करणं हाच चान-ओचा यांचा प्राधान्यक्रम होता.
सामान्य लोकांत अदून्यदेत यांच्याविषयी कमालीचा जिव्हाळा होता. तसंच राजावर टीका केल्यास राजद्रोहाच्या कायद्याअंतर्गत कठोर टीका केली जात असे. अदून्यदेत यांच्या काळात अनेक वेळा सत्तेत उलथापालथ झाली. असं असलं तरी, आज त्यांच्या मृत्यूनंतरही थायलंडमध्ये राजेशाही मजबूत आहे आणि याचं श्रेय अदून्यदेत यांच्या राजनैतिक कौशल्य आणि सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचं कसब यालाच द्यायला हवं.

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन, सामान्य लोकांत अद्युल्लदेज यांच्याविषयी कमालीचा जिव्हाळा होता. तसंच राजावर टीका केल्यास राजद्रोहाच्या कायद्याअंतर्गत कठोर शिक्षा केली जात असे. अद्युल्लदेज यांच्या काळात अनेक वेळा सत्तेत उलथापालथ झाली. असं असलं तरी, आज त्यांच्या मृत्यूनंतरही थायलंडमध्ये राजेशाही शाबूत आहे आणि याचं श्रेय अद्युल्लदेज यांच्या राजकीय कौशल्याला द्यावी लागेल.