बांगलादेशातील हिंदूंचा फाळणीत गमावलेली मालमत्ता परत मिळवण्यासाठी संघर्ष

व्हीडिओ कॅप्शन, बांगलादेशातील हिंदूंचा फाळणीत गमावलेली मालमत्ता परत मिळवण्यासाठी संघर्ष

जुन्या ढाकामधील अल्पसंख्यांक हिंदूंची घरं सुवर्णकाळाची साक्ष देतात. पण वाद आणि दाव्यांमध्ये अडकलेल्या या वास्तू आज जीर्ण झाल्या आहेत.

लाखो अल्पसंख्यांक हिंदू फाळणीनंतर मालमत्ता सोडून इथून पळाले होते. बांगलादेशातील पूर्वजांची मालमत्ता हस्तगत करण्यासाठी त्यांना आता संघर्ष करावा लागत आहे.

न्यायालयात अशा अनेक प्रकरणांची सुनावणी सुरू आहे. काहींचे निकाल अल्पसंख्यांकाच्या बाजूने लागलेही आहेत. सरकार या विषयाकडे काळजीपूर्वक लक्ष देत असल्याचा दावा करत आहे. पण वेळ फार लागत आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)