थायलंडमधील फेरीवाल्यांची कलरफूल आयडिया

थायलंडच्या एरी शहरात फेरीवाले प्रत्येक दिवशी ठराविक रंगाचे कपडे वापरतात. यामुळं इथला परिसर सुंदर तर दिसतोच तसंच व्यापाऱ्यांमधील एकीची भावनाही वाढीस लागली आहे.

थायलंडमध्ये एरी येथील विक्रेत.

फोटो स्रोत, Frank Fell/Getty Images

फोटो कॅप्शन, 2014 मध्ये थायलंडमधील लष्करी सरकारनं बँकाकमध्ये स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. इथल्या सरकारनं 8 मार्च 2017 पर्यंत एरी परिसरातील फेरीवाल्यांना व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिले होते. नंतर हा निर्णय स्थगित ठेवण्यात आला. पण यानंतर येथील रस्त्यांवर व्यवसाय करणाऱ्यांनी परिसरात सुधारणा कशा करता येतील आणि आपला रोजगार कसा वाचवात येईल, यावर विचार सुरू केला. त्यातून प्रत्येक दिवसासाठी ठराविक रंगाचे कपडे परिधान करण्याची प्रथा पुन्हा सुरू करण्याचा त्यांनी घेतला. कपड्यांतील समन्वयातून इथले रस्ते कसं सुंदर दिसतील? बँकॉकच्या रस्त्यांना आपण कसं मूल्य देता येईल, असा विचार या मागे होता. कपड्यांच्या रंगाच्या या परंपरेचा मूळ हिंदू संस्कृतीमधून आलं आहे. थायलंडवर 9 ते 15 व्या शतकापर्यंत हिंदू अंगकोर राजांची सत्ता होती. त्यामुळं हिंदू संस्कृतीचा प्रभाव थायी संस्कृतीवर आहे.
रविवारी येथील विक्रेते लाल रंग वापरतात.

फोटो स्रोत, NICOLAS ASFOURI/Getty Images

फोटो कॅप्शन, रविवारी येथील विक्रेते लाल रंगाचे कपडे परिधान करतात. इथल्या परंपरेनुसार हा रंग सूर्य देवाशी संबंधित आहे.
थायलंडमधील विक्रेते सोमवारी पिवळा रंग वापरतात.

फोटो स्रोत, Jeff Greenberg/Getty Images

फोटो कॅप्शन, सोमवारी येथील व्यापारी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करतात. हा रंग चंद्राचा असल्याचं मानल जात. थायलंडमधील राजाचा ध्वजही पिवळाच आहे.
विक्रेते मंगळवारी गुलाबी रंगाचे कपडे परिधान करतात.

फोटो स्रोत, David Longstreath/Getty Images

फोटो कॅप्शन, थायलंडमधील विक्रेते मंगळवारी गुलाबी रंगाचे कपडे वापरतात. हा रंग मंगळ ग्रहाचं प्रतीक असल्याचं मानलं जात.
बुधवारी विक्रेते हिरव्या रंगाचे कपडे परिधान करतात.

फोटो स्रोत, Danny Gagliardi / Alamy Stock Photo

फोटो कॅप्शन, बुधवारी विक्रेते हिरव्या रंगाचे कपडे परिधान करतात. हा रंग बुध ग्रहाचा मानला जातो.
गुरूवारी विक्रेते नारंगी रंगाचे कपडे परिधान करतात.

फोटो स्रोत, Daniel Berehulak/Getty Images

फोटो कॅप्शन, गुरूवारी विक्रेते नारंगी रंगाचे कपडे परिधान करतात. हा रंग गुरू या सर्वात मोठ्या ग्रहाशी असल्याचं मानलं जात.
शुक्रवारी विक्रेते निळ्या रंगाचे कपडे परिधान करतात.

फोटो स्रोत, Evgeny Ermakov / Alamy

फोटो कॅप्शन, शुक्रवारी विक्रेते निळ्या रंगाचे कपडे परिधान करतात. हा रंग शुक्र ग्रहाचं प्रतीक असल्याचं मानलं जात.
शनिवारी विक्रेते जांभळ्या रंगाचे कपडे परिधान करतात.

फोटो स्रोत, Micaela Marini Higgs

फोटो कॅप्शन, शनिवारी विक्रेते जांभळ्या रंगाचे कपडे परिधान करतात. हा रंग शनी ग्रह तसंच हिंदू देवता शनीशी संबंधित असल्याचं सांगितलं जातं.
थायलंडमधील एरी परिसर

फोटो स्रोत, Micaela Marini Higgs

फोटो कॅप्शन, विक्रेत्यांच्या मते, एका दिवशी एकाच रंगाचे कपडे परिधान केल्यानं त्यांच्यात ऐक्याची भावना वाढीस लागली आहे.