शरद पवार संयुक्त पुरोगामी आघाडीचे प्रमुख होऊ शकतात का?
एकीकडे शरद पवार युपीएचे अध्यक्ष होतील का या चर्चा सुरू झाल्या असताना, दुसरीकडे शरद पवार यांनी मात्र UPA चे अध्यक्ष होण्याच्या शक्यता फेटाळल्या आहेत. मात्र, तरीही शरद पवार UPA चे अध्यक्ष होऊ शकतात का, या चर्चेचा सूर राजकीय वर्तुळात उमटतोय.
संयुक्त पुरोगामी आघाडी (UPA) ही एक राजकीय पक्षांची आघाडी आहे. 2004 लोकसभा निवडणुकीनंतर सत्तेसाठी सोनिया गांधी यांनी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या नावाखाली विविध राजकीय पक्षांची मोट बांधली होती. या आघाडीचं नेतृत्व स्वत: सोनिया गांधी यांनीच केलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)