पुण्यात कोरोनाचे रुग्ण वाढले तर लॉकडाऊनही वाढत राहील? - पाहा व्हीडिओ

व्हीडिओ कॅप्शन, पुण्यात कोरोनाचे रुग्ण वाढले तर लॉकडाऊनही वाढत राहील?

आपल्याला कोरोनासोबत जगायला शिकावं लागेल असं सांगत सरकारने अनलॉकची प्रक्रिया सुरू केली होती. पण शहरात कोरोना रुग्णांची संख्या जशी झपाट्याने वाढू लागली तसं परत लॉकडाऊन केलं जात आहे.

पुणे शहरात परत एकदा 10 दिवसांसाठी लॉकडाऊन केलं आहे. पण या लॉकडाऊनमुळे पुण्यात काम करणाऱ्या मजुरांच्या पोटापाण्याचे हाल होत आहेत. महाराष्ट्रातील इतर भागांमधून आलेले मजूर पुण्यातल्या नदीपात्राजवळ दिवसभर थांबतात. तर रात्री दुकानाच्या आडोशाला झोपतात. लॉकडाऊनमुळे हाताला काम नाही. खिशात पैसा नाही. त्यामुळेत्यांना रोज 5 रुपयांचं शिवभोजनही विकत घेता येत नाहीये. सध्या काही सामाजिक संस्था त्यांना जेवण पुरवत आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)