महाराष्ट्र लॉकडाऊन: ‘युपी बिहारचे मजूर मराठी माणसाचं कौतुक करताना महाराष्ट्राचा अभिमान वाटतो.'
पुणे-सोलापूर महामार्गावरून गावाकडं जाणाऱ्या मजुरांना गेल्या काही दिवसांपासून सुनीता बागल जेवण पुरवत आहेत. त्या सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातल्या रांझणी गावच्या शेतकरी आहे.
सध्या लॉकडाऊनमुळे शहरातून हजारो कामगार गावाकडे चालत जातायत. महामार्गाजवळच्या गावांतून मजुरांच्या जेवणाची आणि पाण्याची सोय केली जातेय.
परप्रांतातल्या मजुरांसाठी घरातली आणि शेतातली कामं उरकून रोज सुनीता हे काम करत आहेत. अन्न आणि पाणी वाटपात तरुण मुलांचा विशेष सहभाग दिसत आहे.
कोरोनाची भीती त्यांना वाटत आहे. पण माणुसकी जपण्यासाठी ते हे काम करत आहेत.
तसंच स्वत:ची काळजी घेण्यासाठी मास्क, हँडग्लोव्ह, सॅनिटायझर आणि सुरक्षित अंतर ठेवत आहेत. या कामाची दाद देत स्थानिक पोलिसांनीही या गावकऱ्यांचं कौतुक केलं आहे.
बीबीसी मराठीचे प्रतिनिधी गणेश पोळ यांचा हा रिपोर्ट

- वाचा - महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 4.0 मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)