ISISचा शेवटचा गड असलेल्या सीरियाच्या बागूझला अमेरिकन आणि कुर्दीश सैन्याने घेरलंय

कधी काळी सीरिया आणि इराकच्या भूभागावर कब्जा करणारं इस्लामिक स्टेट शेवटची घटका मोजतंय. कुर्दीश सैन्याच्या म्हणण्यानुसार मार्चमध्येच आयएसच्या पराभवाची घोषणा केली जाईल.

अमेरिकन सैन्याच्या मदतीने कुर्दीश सैन्य आयएसवर शेवटच्या हल्ल्याची तयारी करतंय. सीरियाच्या बागूझ या छोट्याश्या भागात उरलेल्या आयएस बंडखोरांना आता चारही बाजूंनी घेरण्यात आलंय. बीबीसी प्रतिनिधी क्विंटन सॉमरव्हिल यांचा स्पेशल रिपोर्ट.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)