मार्मिकः बाळासाहेब ठाकरे यांनी इंदिरा गांधींच्या कारभारावर रेखाटलेले 10 निवडक फटकारे

इंदिराजींच्या कारभारावर बाळासाहेबांनी तुफान फटकारे लगावले. यातलीच 10 निवडक व्यंगचित्रं....

बाळासाहेब ठाकरे यांनी काढलेलं व्यंगचित्र

फोटो स्रोत, Prabodhan Publication

फोटो कॅप्शन, ‘गरिबी हटाव’ 1971 : आज जशी ‘अच्छे दिन’ची घोषणा चर्चेत आहे, तशी इंदिरा गांधींच्या काळात ‘गरिबी हटाव’ घोषणा तुफान गाजली. इंदिरा गांधींनी ‘गरिबी हटाव’चा नारा दिला खरा, पण त्यांचे निवडणूक दौरे मात्र बादशाही थाटाचे असल्याची टीका होत होती. त्यावर बाळासाहेबांचं हे मार्मिक भाष्य!
बाळासाहेब ठाकरे यांनी काढलेलं व्यंगचित्र

फोटो स्रोत, Prabodhan Publication

फोटो कॅप्शन, ‘काश्मिरी गुलाबाचे काटे’ 1975 : काश्मीर प्रश्न आजही धगधगतो आहे. 1975 मध्ये काश्मीरमध्ये शेख अब्दुल्ला यांची नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसमध्ये घरोबा झाला. त्या घरोब्यावर, काश्मिरी गुलाबाचे काटे रक्तबंबाळ करत असल्याची टोकदार टीका बाळासाहेबांनी केली होती.
बाळासाहेब ठाकरे यांनी काढलेलं व्यंगचित्र

फोटो स्रोत, Prabodhan Publication

फोटो कॅप्शन, ‘नाकी नऊ आले’1967 : इंदिरा गांधींनी काँग्रेस आणि सत्तेची सूत्रं हातात घेतल्यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये प.बंगाल, तामिळनाडूसह नऊ राज्यांमध्ये काँग्रेसविरोधी कौल मिळाला. या पराभवाचं बाळासाहेबांनी ‘नाकी नऊ आले’ असं चपखल वर्णन केले.
बाळासाहेब ठाकरे यांनी काढलेलं व्यंगचित्र

फोटो स्रोत, Prabodhan Publication

फोटो कॅप्शन, वारे सदिच्छा! 1975 : अमेरिका भारताच्या बाजूने आहे की पाकिस्तानच्या ? हे कोडे आजही कायम आहे. 1975 मध्ये तत्कालीन अमेरिकी पररराष्ट्रमंत्री हेन्री किसिंजर भारत दौऱ्यावर आले असताना बाळासाहेबांना लगावलेला हा फटकारा!
बाळासाहेब ठाकरे यांनी काढलेलं व्यंगचित्र

फोटो स्रोत, Prabodhan Publication

फोटो कॅप्शन, ‘माझ्या बदनामीसाठीचा बनाव’ 1977 : आणीबाणीच्या काळातील चौकशीसाठी जनता सरकारने शहा आयोग नेमला होता. हा आपल्या बदनामीचा डाव असल्याचा आरोप इंदिरा गांधींनी केला होता. त्या आरोपावर बाळासाहेबांचा तिरका कटाक्ष
बाळासाहेब ठाकरे यांनी काढलेलं व्यंगचित्र

फोटो स्रोत, Prabodhan Publication

फोटो कॅप्शन, ‘केक कुठे आहे?’ 1978 : काँग्रेस पक्षाची वर्षानुवर्षं अनेक शकलं होत आली आहेत. 1978 मध्ये काँग्रेसच्या विभाजनावर बाळासाहेबांची मल्लीनाथी. यशवंतराव चव्हाण आणि ब्रह्मानंद रेड्डींसारख्या ज्येष्ठ नेतेही इंदिरा गांधींना विरोध करू शकले नाहीत.
बाळासाहेब ठाकरे यांनी काढलेलं व्यंगचित्र

फोटो स्रोत, Prabodhan Publication

फोटो कॅप्शन, आमची स्वातंत्र्यदेवता 1982 : व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी हा सध्या अत्यंत कळीचा मुद्दा झाला आहे. इंदिरा गांधींच्या काळातही हा मुद्दा चर्चेत होता. पॅलेस्टाईन जनतेला इंदिरा गांधी पाठिंबा देत असताना स्वदेशात मात्र व्यक्तिस्वातंत्र्य पायदळी तुडवत असल्याची टीका बाळासाहेबांनी केली होती.
बाळासाहेब ठाकरे यांनी काढलेलं व्यंगचित्र

फोटो स्रोत, Prabodhan Publication

फोटो कॅप्शन, मोकळ्या हवेतून स्वगृही 1983 : जनता पक्षाला पराभूत करून इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत आल्या. सुरुवातीचे दिवस चांगले गेल्यानंतर देशभरातलं वातावरण पुन्हा अस्वस्थ झालं. ठिकठिकाणी दंगली होऊ लागल्या, पंजाबात हिंसाचार सुरू झाला आणि पक्षांतर्गत लाथाळ्यांनीही उचल खाल्ली.
बाळासाहेब ठाकरे यांनी काढलेलं व्यंगचित्र

फोटो स्रोत, Prabodhan Publication

फोटो कॅप्शन, गरिबी हटाव वि. इंदिरा काँग्रेस हटाव 1983 : इंदिरा गांधींची ‘गरिबी हटाव’ची घोषणा 1983 मध्ये हवेत विरत चालल्याची जाणीव झाली होती. या घोषणेची बाळासाहेबांनी त्यांच्या खास शैलीत उडवलेली खिल्ली
बाळासाहेब ठाकरे यांनी काढलेलं व्यंगचित्र

फोटो स्रोत, Prabodhan Publication

फोटो कॅप्शन, शब्दांची गरजच नाही – 1984 : इंदिरा गांधींची 1984 मध्ये हत्या झाली. त्यांच्या हयातीत त्यांच्या धोरणावर कठोर टीका करणाऱ्या बाळासाहेबांनी इंदिराजींनी अशी अनोखी श्रद्धांजली अर्पण केली होती.