पाहा फोटो : गुजरात निवडणुका आणि 'शिवभक्त' राहुल गांधींची मंदिरवारी

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी प्रचारादरम्यान विविध मंदिरांना भेटी दिल्या आहेत. मी शिवभक्त आहे माझा स्वतःर विश्वास आहे असं राहुल यांनी म्हटलं.

अक्षरधाम मंदिरात राहुल गांधी.

फोटो स्रोत, TWITTER/INCINDIA

फोटो कॅप्शन, राहुल गांधींनी गुजरात निवडणूक प्रचारादरम्यान आपल्या नवसृजन यात्रेची सुरुवात स्वामीनारायण पंथाच्या अक्षरधाम मंदिरापासून केली. पटेल समाजाचा या मंदिराशी जवळचा संबंध आहे. गुजरात निवडणूकीत काँग्रेस पटेल समाजात आपला जम बसवण्याचा प्रयत्न करत आहे.
बनासकांठा जिल्ह्यात राहुल गांधी.

फोटो स्रोत, TWITTER/INCINDIA

फोटो कॅप्शन, रविवारचा शेवट राहुल गांधींनी बनासकांठा जिल्ह्यातल्या अंबाजी मंदिरात दर्शन घेऊन केला. गुजरात निवडणुका 9 डिसेंबर ते 18 डिसेंबर दरम्यान पार पडतील.
राहुल गांधी.

फोटो स्रोत, TWITTER/OFFICEOFRG

फोटो कॅप्शन, सप्टेंबर महिन्यात गुजरात दौऱ्याची सुरुवात राहुल गांधींनी चामुंडा देवीचं दर्शन घेऊन केली होती.
राहुल गांधी द्वारकाधीश मंदिरात.

फोटो स्रोत, TWITTER/OFFICEOFRG

फोटो कॅप्शन, सप्टेंबर महिन्यात राहुल गांधींनी द्वारकाधीश मंदिरातही दर्शन घेतलं होतं.
राहुल गांधी.

फोटो स्रोत, TWITTER/OFFICEOFRG

फोटो कॅप्शन, गुजरातच्या दाहोडमधल्या कबीर मंदिरात दर्शन घेताना राहुल गांधी.
अशोक गेहलोत यांच्यासह राहुल गांधी.

फोटो स्रोत, TWITTER/OFFICEOFRG

फोटो कॅप्शन, सप्टेंबर महिन्यात नवरात्रादरम्यान राहुल गांधींनी विविध गरब्यांनाही हजेरी लावली होती.
राहुल यांची मंदिर यात्रा.

फोटो स्रोत, PTI

फोटो कॅप्शन, उत्तर प्रदेश निवडणुकांच्यावेळी राहुल यांना अयोध्येतही दर्शन घेतलं होतं.
राहुल यांची मंदिर यात्रा.

फोटो स्रोत, PTI

फोटो कॅप्शन, उत्तराखंडच्या केदारनाथ मंदिरात दर्शन घेतल्यानंतर राहुल गांधी.
राहुल यांना अनेक मंदिरांना भेट दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 2004 साली अमेठी निवडणुकांच्या दरम्यान एका मंदिरात राहुल गांधी.