लडाखच्या महिला भिख्खूंच्या मठातली क्षणचित्रं

हिमालयात लडाखमध्ये नयरमा गावात महिला भिख्खूंसाठी तब्बल 28 मठ आहेत.

बौद्ध महिला भिक्खूंचे मठ

फोटो स्रोत, DEEPTI ASTHANA

फोटो कॅप्शन, हिमालयाने वेढलेल्या लडाखच्या दुर्गम भागात बहुतांश लोक बौद्धधर्मीय आहेत. इथले बौद्ध मठ दरवर्षी हजारो पर्यटकांना आपल्याकडं आकर्षित करतात. याच भागात महिला भिक्खूंची 28 बौद्ध मठं आहेत. दिल्लीच्या छायाचित्रकार दिप्ती अस्थाना यांनी नयरमा गावाचा दौरा केला आणि इथल्या महिला भिक्खूंच्या मठांमधली काही क्षणचित्रं टिपली.
बौद्ध महिला भिक्खूंचे मठ

फोटो स्रोत, DEEPTI ASTHANA

फोटो कॅप्शन, बुद्धाच्या काळापासूनच महिला भिक्खू्ंची परंपरा बौद्ध धर्मात राहिली आहे. महिला अधिकारांचे संकेत त्यातून दिले जायचे. पण काळानुरूप महिला भिक्खू्ंची स्थिती बिघडत गेली. पुरुष भिक्खू्ंसाठी मठ होते, ज्यात ते वास्तव्य करू शकायचे. पण महिला भिक्खू्ंसाठी अशी कुणतीच जागा नव्हती.
बौद्ध महिला भिक्खूंचे मठ

फोटो स्रोत, DEEPTI ASTHANA

फोटो कॅप्शन, 2010 मध्ये चट्न्यानलिंगमध्ये काही वरिष्ठ महिला भिक्खूंना आपलं घर मिळालं. लडाख महिला भिक्खू संघटनेनं मग त्यांच्यासाठी इथं एक मठ उभारला. ही संघटना तयार करणाऱ्या डॉ. सेरिंग पाल्मो सांगतात की या महिला भिक्खूंना मदतीची फार गरज होती. एकेकाळी त्यांच्यासमोर दररोजच्या खाण्याचाही प्रश्न होता.
लोबजंग डोलमा

फोटो स्रोत, DEEPTI ASTHANA

फोटो कॅप्शन, या मठातील सर्वांत वयोवृद्ध महिला भिक्खू लोबजंग डोलमा (85) या इथे येण्याआधी शेतमजूरी करायच्या.
डॉ. पाल्मो आणि बौद्ध दर्शनाचा अभ्यास करणारे भिक्खू.

फोटो स्रोत, DEEPTI ASTHANA

फोटो कॅप्शन, या छायाचित्रात डॉ. पाल्मो (समोरच्या रांगेत मध्यभागी) या तरुण महिला भिक्खूंसोबत दिसत आहेत. या महिला भिक्खू बौद्ध दर्शनाचा अभ्यास करत आहेत. पूर्वी फक्त पुरुष भिक्खूंनाच एखाद्या अनुष्ठानासाठी बोलावलं जायचं. आता या महिला भिक्खूंनाही बोलवण्यात येतं. आता हे अनुष्ठानच त्यांच्या कमाईचा मुख्य मार्ग आहे.
कर्मा चुकसित

फोटो स्रोत, DEEPTI ASTHANA

फोटो कॅप्शन, आठ वर्षांची कर्मा चुकसित या मठातील वयानं सर्वांत लहान भिख्खू आहे. 2008 मध्ये जेव्हा ती इथं आली तेव्हा ती कुपोषित होती. डॉ. पाल्मो मानतात की धार्मिक संस्थांमध्ये लिंगभेद होत असतात पण आधुनिक शिक्षण हे तरुण महिला भिक्खूंमध्ये नव्याने आत्मविश्वास भरण्याचं काम करत आहे.
सायकल चालवताना महिला भिक्खू

फोटो स्रोत, DEEPTI ASTHANA

फोटो कॅप्शन, छायाचित्रात एक महिला भिक्खू सायकल चालवताना दिसत आहे. या मठामध्ये भाजीपाल्याची शेती केली जाते. इथं एक ग्रंथालयसुद्धा आहे. डॉ. पाल्मो या मुलींना आणि तरुणींना खेळ आणि सामाजिक उपक्रमांसाठी प्रोत्साहित करतात.
सेरिंग कुंजोम

फोटो स्रोत, DEEPTI ASTHANA

फोटो कॅप्शन, वयाच्या सातव्या वर्षी सेरिंग कुंजोम हिने महिला भिक्खू होण्याचा निर्णय घेतला. डॉ. पाल्मो म्हणतात, भिक्खू होण्याची इच्छा अंतरआत्म्यातून येते. आणि भिक्खू होण्याचा निर्णय एकदा तुम्ही घेतला तर नंतर कुणीही तो रोखू शकत नाही.