एलफिन्स्टन चेंगराचेंगरी : 'लहान बहिणी विचारतात मम्मी कुठं गेली. त्यांना काय सांगू?'

व्हीडिओ कॅप्शन, एलफिन्स्टन रोड स्टेशनवरील पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत 23 जण ठार झाले होते.

एलफिन्स्टन रोड चेंगराचेंगरीच्या घटनेला उद्या महिना पूर्ण होत आहे. या घटनेत 23 जणांचा बळी गेला होता. त्यातल्याच एक होत्या 55 वर्षीय चंद्रभागा इंगळे.

आपल्या दहा मुलांची आणि तीन नातवंडांची जबाबदारी चंद्रभागा इंगळे यांच्यावर होती.

आई गेल्यावर त्यांची मुलगी दीपाली इंगळे या स्वतःचं दुःख बाजूला ठेवून आपल्या लहान बहिणींना सावरण्याचा प्रयत्न करत आहेत.

आपलं दुःख सांगताना त्या म्हणतात, 'लहान बहिणी विचारतात मम्मी कुठं गेली, त्यांना मी काय सांगू?'

29 सप्टेंबरला एलफिन्स्टन रोड स्टेशनवरच्या पुलावरच्या या घटनेनं अशी अनेक कुटुंब पोरकी झाली आहेत.

(बीबीसी मराठीचे प्रतिनिधी राहुल रणसुभे यांचा रिपोर्ट)

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)