या बाजारात 8 दिवसांमध्ये होते 25 हजार उंटांची खरेदी-विक्री

दरवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्या दरम्यान राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यातील पुष्कर येथे उंटांचा बाजार भरतो. जवळजवळ 25 हजार उंटांची यात खरेदी-विक्री केली जाते.

पुष्करची जत्रा बघण्यासाठी जगभरातून लोक येतात. यात विदेशी पर्यटकांची संख्याही मोठी असते.

फोटो स्रोत, PTI

फोटो कॅप्शन, पुष्करची जत्रा बघण्यासाठी जगभरातून लोक येतात. यात परदेशी पर्यटकांची संख्याही मोठी असते.
पुष्कर येथे जगातील सर्वात मोठा उंटांचा बाजार भरतो. उंटांशिवाय इथं गाय, बकरी आणि अन्य प्राण्यांचीही विक्री केली जाते.

फोटो स्रोत, Ahmer Khan

फोटो कॅप्शन, पुष्कर येथे जगातील सर्वात मोठा उंटांचा बाजार भरतो. उंटांशिवाय इथं गायी, म्हशी, बकरी आणि इतर प्राण्यांचीही विक्री केली जाते.
पुष्कर सरोवराच्या जवळ भरणाऱ्या या जत्रेत एक स्पर्धा होते. यात सर्वात जास्त लोकांना पाठीवर बसवू शकेल अशा उंटाला विजेता म्हणून घोषित केलं जातं.

फोटो स्रोत, PTI

फोटो कॅप्शन, पुष्कर सरोवराच्या जवळ भरणाऱ्या या जत्रेत एक स्पर्धा होते. यात सर्वात जास्त लोकांना पाठीवर बसवू शकेल अशा उंटाला विजेता म्हणून घोषित केलं जाीतं.
उंटांच्या शर्यतीने जत्रा सुरू करण्याची परंपरा आहे. तसंच या जत्रेत महिलांशी संबंधित दागिणे, रंग-बिरंगी कपडेही विकत मिळतात.

फोटो स्रोत, PTI

फोटो कॅप्शन, उंटांच्या शर्यतीनं या जत्रेला प्रारंभ करण्याची परंपरा आहे. वेगवेगळे दागिने, रंग-बिरंगी कपड्यांसाठी ही जत्रा प्रसिद्ध आहे.
पुष्करच्या जत्रेत दरवर्षी जवळजवळ 25 हजार उंटांची खरेदी-विक्री केली जाते.

फोटो स्रोत, PTI

फोटो कॅप्शन, पुष्करच्या या जत्रेत दरवर्षी जवळपास 25 हजार उंटांची खरेदी-विक्री केली जाते.
दरवर्षी दोन लाखांपेक्षा अधिक लोक ही जत्रा बघायला येतात. रात्रीच्या वेळी जत्रेत नाच-गाण्याचा कार्यक्रम असतो.

फोटो स्रोत, AHMER KHAN

फोटो कॅप्शन, दरवर्षी दोन लाखांपेक्षा अधिक लोक ही जत्रा बघायला येतात. रात्रीच्या वेळी जत्रेत नाच-गाण्याचा कार्यक्रम असतो.
पुष्कर हे भारतातील सर्वात जुन्या शहरांपैकी एक आहे. या शहरात शेकडोंच्या संख्येने मंदिरं आहेत. कलश यात्रेदरम्यान हिंदू महिला डोक्यावर कलश घेऊन मंदिरात जातात.

फोटो स्रोत, Ahmer Khan

फोटो कॅप्शन, पुष्कर हे भारतातील सर्वात जुन्या शहरांपैकी एक आहे. या शहरात शेकडोंच्या संख्येने मंदिरं आहेत. कलश यात्रेदरम्यान हिंदू महिला डोक्यावर कलश घेऊन मंदिरात जातात.
ही जत्रा सात दिवस चालते. उंट पाळणारे लोक जवळपास 20 हजार उंटांना जत्रेत आपल्यासोबत घेऊन येतात.

फोटो स्रोत, AHMER KHAN

फोटो कॅप्शन, ही जत्रा सात दिवस चालते. उंट पाळणारे लोक जवळपास 20 हजार उंटांना जत्रेत आपल्यासोबत घेऊन येतात.
कार्तिकी पोर्णिमेच्या दिवस या जत्रेचा शेवटचा दिवस असतो. या दिवशी हजारो भाविक पुष्करच्या पवित्र सरोवरात स्नान करतात. असं केल्यानं मोक्ष प्राप्त होईल, अशी त्यांची भावना असते.

फोटो स्रोत, AHMER KHAN

फोटो कॅप्शन, कार्तिकी पोर्णिमेच्या दिवशी या जत्रेचा शेवट होतो. या दिवशी हजारो भाविक पुष्करच्या पवित्र सरोवरात आंघोळ करतात.