केसरबाई केरकरांचा भैरवीचा सूर नासाच्या यानातून अंतराळात
नासाचं व्हॉयेजर-1 आणि व्हॉयेजर-2 यानांच्या मोहिमेला नुकतीच 40वर्षं पूर्ण झाली आहे. पण नासाच्या या यानांसोबत भारतीय शास्त्रीय संगीताचं खास नातं आहे.
व्हॉयेजरसोबत नासानं परग्रहवाशांसाठी 55 भाषांमध्ये खास संदेश पाठवला होता. त्यामध्ये केसरबाई केरकर यांनी गायलेल्या 'जात कहाँ हो' या भैरवीचा ही समावेश करण्यात आला होता.
जाणून घ्या काय होतं कारण ही भैरवी निवडण्यामागचं.
बीबीसी मराठीच्या जान्हवी मुळे यांचा रिपोर्ट.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)