पंजाबच्या या आजी 101 वर्षांच्या आहेत. पण त्यांची फिटनेस तरुणांनाही लाजवेल अशी

व्हीडिओ कॅप्शन, पंजाबच्या या आजी शंभर वर्षांच्या आहेत. पण त्यांची फिटनेस तरुणांनाही लाजवेल अशी.

पटियालामधल्या मानकौर 101 वर्षांच्या आहेत. आठ वर्षांपुर्वी त्यांनी धावायला सुरूवात केली. आणि मास्टर्स स्पर्धेत दोन जागतिक विक्रमांसह आपला वेगळा ठसा उमटवला.

फक्त धावण्याच्या शर्यतीतच नव्हे तर भालाफेक आणि गोळाफेक स्पर्धेतही त्या सहभागी होतात. आज या आजी 'ट्रॅक क्विन' म्हणून ओळखल्या जातात.

(रिपोर्टर - सरबजीत धारीवाल, कॅमेरा - गुलशन कुमार)

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)