भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांनी स्वतःला जमिनीत गाडून घेतलं

जयपूरजवळ असलल्या निंदड गावातील शेतकऱ्यांनी भू समाधी आंदोलन सुरू केलं आहे. सरकारच्या भूमिअधिग्रहणाच्या विरोधात शेतकऱ्यांनी स्वतःला जमिनीत गाडून घेतलं. छायाचित्रांमध्ये बघा शेतकऱ्यांचं हे अनोखं आंदोलन.

शेतकऱ्यांनी गेल्या तीन दिवसांपासून स्वतःला खड्ड्यांमध्ये पुरून घेतले आहे. या आंदोलनात सहभागी झालेला एक शेतकरी संतप्त होत म्हणाला, "एक इंचभर जमिनीचा तुकडाही मी देणार नाही. भलेही माझा जीव गेला तरी चालेल. सरकारला विकास नको तर कारभार करायचा आहे."

फोटो स्रोत, NARAYAN BARETH

फोटो कॅप्शन, शेतकऱ्यांनी गेल्या तीन दिवसांपासून स्वतःला खड्ड्यांमध्ये पुरून घेतलं आहे. या आंदोलनात सहभागी झालेला एक शेतकरी संतप्त होत म्हणाला, "एक इंचभर जमिनीचा तुकडाही मी देणार नाही. भले माझा जीव गेला तरी चालेल. सरकारला विकास नको तर कारभार करायचा आहे."
या आंदोलनात महिलांनीही सहभाग घेतला आहे. या आंदोलनात सहभागी एक महिला छोटा बाई म्हणतात, "माझ्या कुटुंबाच्या नावावर फक्त एक गुंठा जमीन आहे आणि मला पाच मुलं आहेत. त्यांच्यासाठ ही जमिनच सवर्वकाही आहे. कमाईचा एकमेव मार्ग आहे. आम्ही आमच्या मुलांना रस्त्यावर सोडन द्यायच का?"

फोटो स्रोत, NARAYAN BARETH

फोटो कॅप्शन, या आंदोलनात महिलांनीही सहभाग घेतला आहे. सहभागी एक महिला छोटा बाई म्हणतात, "माझ्या कुटुंबाच्या नावावर एक एकरपेक्षाही कमी जमीन आहे आणि त्यात आमचं पाच मुलांचं कुटुंब. त्यांच्यासाठी ही जमीनच सर्वकाही आहे कमाईचा एकमेव मार्ग आहे. आम्ही आमच्या मुलांना रस्त्यावर सोडून द्यायचं का ?"
शेतकऱ्यांच्या मते सरकार साडेआठशे एकर जमीनीचं अधिग्रहण करू इच्छित आहे. आंदोलनस्थळावर दिवसाचं कमाल तापमान 38 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. यामुळे काही शेतकरी बेशूद्धही पडत आहेत.

फोटो स्रोत, NARAYAN BARETH

फोटो कॅप्शन, शेतकऱ्यांच्या मते सरकार साडेआठशे एकर जमीनीचं अधिग्रहण करू इच्छित आहे. आंदोलनस्थळावर दिवसाचं कमाल तापमान 38 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचतं. यामुळे काही शेतकरी बेशुद्धही पडत आहेत.
आंदोलनस्थळी निंदड आणि आसपासच्या गावांतील शेतकरीही गोळा झाले आहेत. निंदडचे शेतकरी बिरबल चौधरी म्हणतात, सरकारच्या या निर्णयामुळं 20 हजार लोकांवर परिणाम होणार आहे. सरकार आम्हाला आमच्या मातीपासून दुर करू इच्छित आहे. आमच्यासाठी त्यांच्याकडं कुठला ठोस कार्यक्रमही नाही.

फोटो स्रोत, NARAYAN BARETH

फोटो कॅप्शन, आंदोलनस्थळी निंदड आणि आसपासच्या गावांतील शेतकरीही गोळा झाले आहेत. निंदडचे शेतकरी बीरबल चौधरी म्हणतात, सरकारच्या या निर्णयामुळं 20 हजार लोकांवर परिणाम होणार आहे. सरकार आम्हाला आमच्या मातीपासून दुर करू इच्छित आहे. आमच्यासाठी त्यांच्याकडे कुठला ठोस कार्यक्रमही नाही.
आंदोलनात सहभागी झालेल्या 80 वर्षीय न्याती बाई याही दोन दिवसांपासून इथं ठाण मांडून बसलेल्या आहेत. न्यातीबाई मोठ्या संतापाने म्हणतात, "हा विकास आहे की सर्वनाश?"

फोटो स्रोत, NARAYAN BARETH

फोटो कॅप्शन, आंदोलनात सहभागी झालेल्या 80 वर्षीय न्याती बाई याही दोन दिवसांपासून इथं ठाण मांडून बसलेल्या आहेत. न्यातीबाई मोठ्या संतापाने म्हणतात, "हा विकास आहे की सर्वनाश?"
जयपूर विकास प्राधिकरणातर्फे भूमिअधिग्रहण केलं जाणार आहे. प्राधिकरणाला यातून एक हजार कोटी रुपये मिळणार आहेत. वाद वाढल्यानं सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चाही झाल्या. मात्र त्यातून काहीच निष्कर्ष निघू शकला नाही. याआधी राजस्थानमधील शेखावटी प्रदेश आणि उत्तर राजस्थानमध्येही शेतकऱ्यांची अशी आंदोलनं झालीत. शेतकऱ्यांच कर्ज माफ करा अशी त्यांची मागणी आहे.

फोटो स्रोत, NARAYAN BARETH

फोटो कॅप्शन, जयपूर विकास प्राधिकरणातर्फे भूसंपादन केलं जाणार आहे. प्राधिकरणाला यातून एक हजार कोटी रुपये मिळणार आहेत. वाद वाढल्यानं सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चाही झाल्या. मात्र त्यातून काहीच निष्कर्ष निघू शकला नाही. याआधी राजस्थानमधील शेखावटी प्रदेश आणि उत्तर राजस्थानमध्येही शेतकऱ्यांची अशी आंदोलनं झालीत. शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा अशी त्यांची मागणी आहे.