एक्सक्लुझिव्ह : राज ठाकरेंचं राजकीय अस्तित्व हरपलं आहे - मुख्यमंत्री फडणवीस
एल्फिन्स्टन रोड स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीनंतर आज राज ठाकरे मुंबईत मेट्रो सिनेमापासून निषेध मोर्चा काढत आहेत. बीबीसी मराठीला रविवारी दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे राजकारण करत असल्याची टीका केली आहे.
राज ठाकरे यांनी अभ्यास करून बोलावं, असंही ते नाव न घेता म्हणाले. मनसेचं हरपलेलं राजकीय अस्तित्व शोधण्याचा राज प्रयत्न करत आहेत, असा टोलाही त्यांनी मारला.
ज्यांना राजकारण करायचं आहे, त्यांनी करावं. महाराष्ट्राच्या हिताचं काय आहे, ते आम्ही करत राहू, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी राज यांच्याशी चर्चेची शक्यता फेटाळली.
संबंधित बातम्या -
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)