५०० आणि १००० च्या नोटा NID मध्ये बनल्या विटा, पर्स, पुस्तकं

नोटबंदीनंतर बंद झालेल्या ५०० आणि १००० च्या नोटांचं नेमकं काय झाल? हा प्रश्न प्रत्येकालाच आपापल्या मनात पडला असेल.

पर्स

फोटो स्रोत, VISHAL ARORA/NID

फोटो कॅप्शन, गेल्या आठवड्यात अहमदाबादच्या नॅशनल इंन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन (NID)च्या विद्यार्थ्यांनी एका विशेष प्रदर्शनाचं आयोजन केलं होतं. ज्यात रद्द झालेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांपासून अनोख्या वस्तू बनवण्यात आल्या होत्या.
विटा

फोटो स्रोत, VISHAL ARORA/NID

फोटो कॅप्शन, NID आणि नेदरलँडमधल्या 'रॉयल डच कस्टर्स इंजिनिअरिंग' या संस्थेनं एकत्र येत 'वॅल्यू फॉर मनी' या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. या स्पर्धेसाठी वाया गेलेल्या किंवा खराब झालेल्या नोटांपासून विविध वस्तू बनवायच्या होत्या. या स्पर्धेसाठी ५०० आणि १००० च्या नोटांपासून या वस्तू बनवण्यात आल्या. असं NIDच्या फर्निचर डिझाईन विभागाचे समन्वयक प्रविण सिंह सोलंकी यांनी बीबीसीला सांगितलं.
विटा आणि पुस्तक

फोटो स्रोत, VISHAL ARORA/NID

फोटो कॅप्शन, ४९ विविध संस्थांमधील १८४ विद्यार्थ्यांना या स्पर्धेसाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. या विद्यार्थ्यांना आरबीआयनं बंद झालेल्या नोटा वस्तू बनवण्यासाठी देण्यात आल्या होत्या.
वाटी

फोटो स्रोत, VISHAL ARORA/NID

फोटो कॅप्शन, सोलंकी यांनी पुढे सांगितलं की, नेदरलँडच्या संस्थेनं चार विजेत्या विद्यार्थ्यांना 'कस्टर्स इंजिनिअरिंग २०१७' हे पारितोषिक दिलं.
ठोकळा

फोटो स्रोत, VISHAL ARORA/NID

फोटो कॅप्शन, NID च्या कँपसमध्ये भरलेल्या या प्रदर्शनात जुन्या नोटांपासून बनलेल्या २२ अनोख्या वस्तू ठेवण्यात आल्या आहेत.
टाइल्स आणि भांडं

फोटो स्रोत, VISHAL ARORA/NID

फोटो कॅप्शन, या नोटांपासून विद्यार्थ्यांनी साऊंड प्रूफ टाइल्स, पर्स, विटा, डायरी इत्यादी वस्तू बनवल्या आहेत.
छोटा बॉक्स

फोटो स्रोत, VISHAL ARORA/NID

फोटो कॅप्शन, पहिल्या चार विजेत्यांना अनुक्रमे १ लाख, ७५ हजार, ५० हजार, २५ हजार अशी रोख पारितोषिकं देण्यात आल्याचं सोलंकी यांनी सांगितलं.
घड्याळ

फोटो स्रोत, VISHAL ARORA/NID

फोटो कॅप्शन, रद्द झालेल्या नोटांचा वापर जमिनीच्या भरावासाठी आणि तेल निर्मितीच्या कामात करण्यात आला आहे. असंही सोलंकी म्हणाले.
घड्याळ

फोटो स्रोत, VISHAL ARORA/NID

फोटो कॅप्शन, या स्पर्धेमुळे जुन्या नोटा रिसायकल करण्यासाठी अनेक कल्पना पुढे आल्या आहेत. या प्रत्येक कल्पनेमागची कहाणी वेगळी आहे. असं अहमदाबादच्या एनआयडीचे संचालक प्रद्युम्न व्यास यांनी सांगितलं.
पिगी बँक

फोटो स्रोत, VISHAL ARORA/NID

फोटो कॅप्शन, नोटांपासून घड्याळ डायरीसारख्या वस्तूच नव्हे तर पुन्हा पैसे साठवण्यासाठी पिगी बँकही तयार करण्यात आली आहे.