फोटो : असं आहे उत्तर कोरियातील सामान्य लोकांचे जीवनमान

एनके न्यूज या वेबसाइटची टीम या महिन्यात उत्तर कोरियाला गेली होती. त्यांनी तिथल्या सामान्य लोकांचं जीवनमान जाणून घेण्याचा केलेला हा प्रयत्न.

प्योंगयांग मेट्रोतून घरी जाताना शाळेतील मुलं.

फोटो स्रोत, NK NEWS

फोटो कॅप्शन, प्योंगयांग मेट्रोतून घरी जाताना शाळेतील मुलं.
हे लोक वोंसन या समुद्र किनाऱ्यावर वसलेल्या गावातील उलिम धबधब्यावर सहलीचा आनंद घेत आहेत.

फोटो स्रोत, NK NEWS

फोटो कॅप्शन, वोंसन या समुद्र किनाऱ्यावर वसलेल्या गावातील उलिम धबधब्यावर तरुणाई सहलीचा आनंद घेते.
या मुलांनी ट्रॅक सुट घातला आहे. निरखून पाहिलं तर त्यावर पाश्चिमात्य ब्रॅंडची नावं दिसून येत आहेत. या ब्रॅंडच्या नावांची नक्कल केल्याची शक्यता आहे.

फोटो स्रोत, NK NEWS

फोटो कॅप्शन, या मुलांनी ट्रॅक सुट घातला आहे. निरखून पाहिलं तर त्यावर पाश्चिमात्य ब्रॅंडची नावं दिसून येत आहेत. या ब्रॅंडच्या नावांची नक्कल केल्याची शक्यता आहे.
वोंसन आणि जपानच्या निगाटा बंदरादरम्यान वाहतुकीसाठी अशा जहाजांचा वापर केला जातो. 2006 साली आंतरराष्ट्रीय निर्बंधांमुळे ही वाहतूक बंद आहे. परंतु, वोंसनमध्ये वाहतूक सुरू आहे.

फोटो स्रोत, NK NEWS

फोटो कॅप्शन, वोंसन आणि जपानच्या निगाटा बंदरादरम्यान वाहतुकीसाठी अशा जहाजांचा वापर केला जातो. 2006 साली आंतरराष्ट्रीय निर्बंधांमुळे ही वाहतूक बंद आहे. परंतु, वोंसनमध्ये वाहतूक सुरू आहे.
क्लैम्ज नावाचा समुद्री मासा इथं खूप लोकप्रिय आहे. पण, याच्या उत्पादनातील बहुतांश हिस्सा निर्यात केला जातो.

फोटो स्रोत, NK NEWS

फोटो कॅप्शन, क्लैम्ज नावाचा समुद्री मासा इथं खूप लोकप्रिय आहे. पण, याच्या उत्पादनातील बहुतांश हिस्सा निर्यात केला जातो.
जपान आणि चीनमधून आयात केलेल्या इलेक्ट्रिक सायकल सुरुवातीच्या काळात राजधानीच्या (प्योंगयांग) शहरातच दिसायच्या. पण, आता इतर लहान शहरातही या सायकल दिसतात.

फोटो स्रोत, NK NEWS

फोटो कॅप्शन, जपान आणि चीनमधून आयात केलेल्या इलेक्ट्रिक सायकल सुरुवातीच्या काळात राजधानीच्या (प्योंगयांग) शहरातच दिसायच्या. पण, आता इतर लहान शहरातही या सायकल दिसतात.
पण, इथली परिवहन व्यवस्था फारसी चांगली नाही. हा माणूस रिसायकल करण्यासाठी मोठं भंगार बैलगाडीतून घेऊन जात आहे.

फोटो स्रोत, NK NEWS

फोटो कॅप्शन, पण, इथली परिवहन व्यवस्था फारशी चांगली नाही.
मध्यभागी बसलेल्या महिलेच्या हातात जपानी-चिनी ब्रॅंड 'मिनिसो'ची पिशवी आहे. मिनिसोनं त्याचं पहिलं आऊटलेट प्योंगयांगमध्ये उघडलं आहे.

फोटो स्रोत, NK NEWS

फोटो कॅप्शन, मध्यभागी बसलेल्या महिलेच्या हातात जपानी-चिनी ब्रॅंड 'मिनिसो'ची पिशवी आहे. मिनिसोनं त्याचं पहिलं आऊटलेट प्योंगयांगमध्ये उघडलं आहे.
पेट्रोल-डिझेलच्या आयातीवर घातलेल्या निर्बंधांचा इथं परिणाम दिसून येत आहे. काही पेट्रोल पंप बंद झाले आहेत. वीजेच्या कमतरतेमुळे लोकांनी सोलार पॅनल लावले आहेत. ही इमारत केइसोंग शहरातील आहे.

फोटो स्रोत, NK NEWS

फोटो कॅप्शन, पेट्रोल-डिझेलच्या आयातीवर घातलेल्या निर्बंधांचा इथं परिणाम दिसून येत आहे. काही पेट्रोल पंप बंद झाले आहेत. वीजेच्या कमतरतेमुळे लोकांनी सोलार पॅनल लावले आहेत. ही इमारत केइसोंग शहरातील आहे.
आर्थिक अडचणी असतानाही दरवर्षी राजधानील विशाल परेडचं आयोजन केलं जातं. फोटोमध्ये दिसत असलेली मुलगी परेड सुरू होण्याची वाट पाहत आहे.

फोटो स्रोत, NK NEWS

फोटो कॅप्शन, आर्थिक अडचणी असतानाही दरवर्षी राजधानीत विशाल परेडचं आयोजन केलं जातं. फोटोमध्ये दिसत असलेली मुलगी परेड सुरू होण्याची वाट पाहत आहे.
इथं नेहमी लोकांना परकीय आक्रमणाची भीती असते. सतत तणाव असला तरी लोकांच्या चेहऱ्यावर हास्य असतं.

फोटो स्रोत, NK NEWS

फोटो कॅप्शन, इथं नेहमी लोकांना परकीय आक्रमणाची भीती असते. सतत तणाव असला तरी लोकांच्या चेहऱ्यावर हास्य असतं.
युद्धासाठी तयार असल्याचं उत्तर कोरिया नेहमी सांगते. या फोटोत रणगाड्यांना रोखण्यासाठीचा ढाचा आहे. ज्याच्या पायथ्याशी स्फोटकं आहेत. हल्ला झालाच तर या ढाच्याला उद्ध्वस्त करून रणगाड्यांना रोखता येईल.

फोटो स्रोत, NK NEWS

फोटो कॅप्शन, युद्धासाठी तयार असल्याचं उत्तर कोरिया नेहमी सांगते. या फोटोत रणगाड्यांना रोखण्यासाठीचा ढाचा आहे. ज्याच्या पायथ्याशी स्फोटकं आहेत. हल्ला झालाच तर या ढाच्याला उद्ध्वस्त करून रणगाड्यांना रोखता येईल.