You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमित ठाकरेंना हरवून 'जायंट किलर' ठरलेले महेश सावंत काय म्हणाले?
संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या माहिम विधानसभा मतदारसंघाच्या लढतीत अमित ठाकरेंचा पराभव करून, उद्धव ठाकरे गटाचे महेश सावंत 'जायंट किलर' ठरले आहेत. महेश सावंत यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार सदा सरवणकर यांचा 1 हजार 340 मतांनी पराभव केला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे माहीममध्ये निवडणूक लढवत असल्याने हा मतदारसंघ चर्चेत आला होता. अमित ठाकरे यांना तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली.
शिवसेनेचा जन्म झालेला मतदारसंघ आपल्याकडे राखण्यात उद्धव ठाकरेंना यश मिळाल्याचं दिसतंय.
शिवसेना शिंदे गटाच्या सदा सरवणकर यांनीही या मतदारसंघात उमेदवारी दाखल केली आणि माहीममधली लढत चुरशीची होणार हे स्पष्ट झालं होतं. मात्र, माहीमच्या मतदारांनी माजी आमदार आणि राज ठाकरेंना नाकारत उद्धव ठाकरेंच्या विभाग प्रमुखाला आमदार म्हणून पसंती दिली.
शिंदे गटाचे सदा सरवणकर दुसऱ्या क्रमांकावर राहिले असून अमित ठाकरेंना तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली आहे. मनसेसाठी हा पराभव धक्कादायक ठरला आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)