You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लंडनमध्ये दीड लाख लोक सहभागी असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण कसं मिळालं?
लंडनमध्ये 'युनाइट द किंगडम' या रॅलीदरम्यान हिंसाचार उसळला, त्यात 26 अधिकारी जखमी झाले असून त्यापैकी चौघं गंभीर आहेत.
कट्टर उजव्या विचारसरणीचे कार्यकर्ते टॉमी रॉबिन्सन यांनी आयोजित केलेल्या या मोर्चासाठी दीड लाख लोक जमा झाले. जमावानं पोलिसांवर बाटल्या फेकल्या, लाथाबुक्यांचा मारा झाला. जवळच स्टँड अप टू रेसिझम या प्रति-आंदोलनात 5000 लोक सहभागी झाले.
गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि दोन गटांना वेगळं करण्यासाठी दंगल नियंत्रक पोलीस, घोडे आणि कुत्र्यांची मदत घेण्यात आली. पोलिसांनी 25 जणांना अटक केली असून अतिरिक्त 1500 अधिकारी घटनास्थळी तैनात करण्यात आले.
टेक अब्जाधीश इलॉन मस्क यांनीही या रॅलीला व्हीडिओद्वारा संबोधित केलं. मस्क यांनी 'अनियंत्रित स्थलांतरणाविरोधात' भाष्य केलं आणि यूकेमध्ये सरकार बदलण्याची मागणी केली.
रॉबिन्सन यांनीही राजकारण्यांवर टीका केली आणि भाषण स्वातंत्र्यावर जोर दिला. तर विरोधातल्या आंदोलनात बोलताना खासदार डायन अॅबॉट यांनी वंशवाद आणि फॅसिझमला विरोध करण्याचं आवाहन केलं.