विशाळगडाजवळ गजापूर गावात झालेल्या हिंसाचाराचा फटका बसलेले लोक सांगतात...

विशाळगडाजवळ गजापूर गावात झालेल्या हिंसाचाराचा फटका बसलेले लोक सांगतात...

विशाळगडावरील अतिक्रमण पाडलं जावं या मागणीसाठी 14 जुलैला मोठा जमाव गडाकडे जात होता. पोलिसांनी जमावाला गडावर जाण्याची परवानगी नाकारली, तेव्हा जमावाने जवळच्या गजापूर गावाकडे मोर्चा वळवला.

या गावात त्यांनी मोठ्या प्रमाणात नासधूस केली. कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांनी या आंदोलनाशी व हिंसेशी आपला संबंध नसल्याचं आधीच म्हटलं होतं. झाल्या प्रकाराबद्दल विरोधी पक्षांनी प्रशासन आणि पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.

गजापूरच्या गावकऱ्यांनी बीबीसी मराठीला आपला अनुभव सांगितला.

रिपोर्ट - प्राची कुलकर्णी

शूट - नितीन नगरकर

व्हीडिओ एडिटिंग - निलेश भोसले