You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ब्रिटनच्या लेस्टरमध्ये झालेल्या 'त्या' हिंदू-मुस्लीम हिंसाचारामागचं कारण काय?
1950 च्या दशकापासून लेस्टरमध्ये भारतीय आणि पाकिस्तानी लोक चेन मायग्रेशन किंवा साखळी स्थलांतराच्या पद्धतीनं आले. म्हणजेच त्यांच्या कुटुंबातील किंवा गावातील लोक इथे होते म्हणूनच तेसुद्धा इथे आले.
त्यांच्यासाठी लेस्टर एक चांगलं ठिकाण होतं. इथे समृद्धी होती. इथे डनलप, इंपीरियल टाइपरायटर आणि मोठ्या होजियरी (कापड) मिल मध्ये नोकऱ्या होत्या.
17 सप्टेंबर 2022 ला दोन्ही समुदायातील तणावाचं रुपांतर रस्त्यावरील हिंसाचार झाला होता. हिंदू आणि मुस्लीम समुदायामध्ये झालेल्या चकमकींत काही पोलिस कर्मचारीसुद्धा जखमी झाले होते.
डझनावारी लोकांना अटक करण्यात आली होती.
बीबीसी प्रतिनिधी राघवेंद्र राव आणि देवाशिष कुमार यांचा रिपोर्ट